जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे आग्रह धरावा

जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र जीएम तंत्रज्ञान व एचटीबिटी वापरण्यास बंदी आहे.
minister
minister

नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र जीएम तंत्रज्ञान व एचटीबिटी वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे उत्पादकतेत भारतीय शेतकरी पिछाडीवर असल्याने एचटीबिटीसह जीएम पिकांच्या मान्यतेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे आग्रह धरावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. एच.टी.बिटी या विषयावर शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच कृषीमंत्री दादा भुसे यांच्यात मंगळवारी (ता.२) चर्चा झाली.   जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप, राजेंद्र झोटींग, विजय निवल, मधुसूदन हरणे, राम नवले, सुनील चरपे, सतीश दाणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी उपस्थित होते.  कापूस पिकात होणाऱ्या तणाचे नियंत्रण करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होते. मजुरांमार्फत हे काम करताना वेळ, श्रम आणि पैसाही खर्च होतो. तणाला प्रतिकारक वाणाला मान्यता मिळाल्यास शेतकऱ्यांचे हे कष्ट वाचणार आहे. जगातील अनेक देशांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आणि त्या माध्यमातून कापसातील उत्पादकता खर्च कमी करण्यात ते यशस्वी झाले. त्याच धर्तीवर भारतातही या तंत्रज्ञानाला मान्यता मिळावी. त्यासोबतच जी एम तंत्रज्ञानाबाबतही डॉ. मायी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना माहिती दिली. फसवणुकीचे प्रकार वाढले शासनाने जीएम तसेच एचटीबीटी चाचण्यांना परवानगी दिली नसल्याने बाजारात बोगस बियाणे आणले जाते. त्यातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारावर पायबंद घालण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, त्याकरिता केंद्र सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवावा, असा आग्रह देखील यावेळी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींकडून धरण्यात आला. या हंगामात अनधिकृत एचटी बिटी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येवू नये, त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com