agriculture news in Marathi give permission for GM crop Maharashtra | Agrowon

जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे आग्रह धरावा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र जीएम तंत्रज्ञान व एचटीबिटी वापरण्यास बंदी आहे.

नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र जीएम तंत्रज्ञान व एचटीबिटी वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे उत्पादकतेत भारतीय शेतकरी पिछाडीवर असल्याने एचटीबिटीसह जीएम पिकांच्या मान्यतेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे आग्रह धरावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. एच.टी.बिटी या विषयावर शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच कृषीमंत्री दादा भुसे यांच्यात मंगळवारी (ता.२) चर्चा झाली.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप, राजेंद्र झोटींग, विजय निवल, मधुसूदन हरणे, राम नवले, सुनील चरपे, सतीश दाणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी उपस्थित होते. 

कापूस पिकात होणाऱ्या तणाचे नियंत्रण करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होते. मजुरांमार्फत हे काम करताना वेळ, श्रम आणि पैसाही खर्च होतो. तणाला प्रतिकारक वाणाला मान्यता मिळाल्यास शेतकऱ्यांचे हे कष्ट वाचणार आहे. जगातील अनेक देशांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आणि त्या माध्यमातून कापसातील उत्पादकता खर्च कमी करण्यात ते यशस्वी झाले. त्याच धर्तीवर भारतातही या तंत्रज्ञानाला मान्यता मिळावी. त्यासोबतच जी एम तंत्रज्ञानाबाबतही डॉ. मायी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना माहिती दिली.

फसवणुकीचे प्रकार वाढले
शासनाने जीएम तसेच एचटीबीटी चाचण्यांना परवानगी दिली नसल्याने बाजारात बोगस बियाणे आणले जाते. त्यातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारावर पायबंद घालण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, त्याकरिता केंद्र सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवावा, असा आग्रह देखील यावेळी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींकडून धरण्यात आला. या हंगामात अनधिकृत एचटी बिटी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येवू नये, त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...