पपईला प्रतिकिलो अकरा रुपये दर द्या, नंदुरबारमधील शेतकऱ्यांची मागणी

खरेदीदार किंवा व्यापारी मात्र नऊ रुपये प्रतिकिलो दर देऊ, असा आडमुठेपणा करीत आहेत. आता बाजारात वाहतुकीसंबंधी अडचणी येत असल्याने बाजारात दरांवर दबाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. - रोहित पटेल, शेतकरी, शहादा
give the price 11 rupees per kg to papaya, demand farmers in Nandurbar
give the price 11 rupees per kg to papaya, demand farmers in Nandurbar

नंदुरबार  : सध्या मार्केटमध्ये मंदी असल्याने वाढीव दर देणे परवडत नसल्याचे कारण देऊन व्यापाऱ्यांनी पपईचे दर कमी केले आहेत. त्यांनी ९ रुपयांपेक्षा अधिक दर देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. ११ रुपये प्रतिकिलो दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

मागील आठवड्यात शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहादा बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, संचालक रवींद्र रावल, पपई उत्पादक समन्वय समितीचे भगवान पाटील, माधव पाटील, सतीश पाटील, उमेश पाटील, दीपक पाटील आदींसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. 

सध्या बाजारपेठेत पपईला मागणी आहे. तरीही व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरून लूट करत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. दरात सतत चढउतार सुरू आहे. पीक कमी आहे. हंगाम अंतिम स्थितीत आहे. काही शेतकऱ्यांचे पीक जोमात आहे. त्याला दर अपेक्षित मिळत नाहीत. नुकसान होत आहे. व्यापारी एकजूट करतात. प्रशासन लक्ष देत नाही, असे मुद्दे शेतकऱ्यांनी उपस्थित केले. पपईली अकरा रुपये प्रतिकिलो दराची मागणीही केली. 

हंगाम लांबला, योग्य दर द्या

यंदाच्या हंगामात वातावरणाच्या बदलामुळे लागवड उशिरा झाली. त्यामुळे फळधारणेस देखील उशिराने सुरुवात झाली. आता काही शेतकऱ्यांचे उत्पादन निघायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सहाजिकच हंगाम लांबला. परवडणारे दर द्यावेत, असे शेतकऱ्यांनी म्हटले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com