‘तुतीला कृषी पिकाचा दर्जा द्या’

‘तुतीला कृषी पिकाचा दर्जा द्या’
‘तुतीला कृषी पिकाचा दर्जा द्या’

नागपूर ः कृषिमंत्री दादा भुसे यांनी बुटीबोरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या तुरकमारी येथील प्रगतिशील शेतकरी श्री. निखाडे यांच्या शेतात जाऊन तुती लागवड व रेशीम कीटक संगोपनाची पाहणी करून रेशीम शेतीसंबंधीची माहीती घेतली. त्या वेळी त्यांच्यासोबत एकनाथ डवले सचिव (कृषी), रेशीम संचलनालयाचे अर्जुन गोरे, आर. टी. जोगदंड सहायक संचालक, पी. एस. पाडवी रेशीम विकास अधिकारी नागपूर हे उपस्थित होते. या वेळी रेशीम संचालनालयाच्या संचालिका भाग्यश्री बानायत यांनी राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ओला दुष्काळ पडला, त्या वेळी रेशीम शेतकऱ्यांचे शेताचे पंचनामे करण्यात आले नाहीत. कारण तुती पिकाला कृषी पिकाचा दर्जा प्राप्त नाही. त्यामुळे रेशीम शेतीला पिकाचा दर्जा मिळावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची ताकद या व्यवसायत असल्याने याला राजाश्रय मिळावा, असेही त्यांनी सांगितले. त्याची दखल घेत रेशीम शेतीला पिकाचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन या वेळी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. इतरही समस्यांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे सांगत या शेतकऱ्यांना शासनाच्या इतर योजनांचे लाभ मिळतील, यासाठीदेखील पाठपुरावा केला जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com