Agriculture news in marathi Give respectful debt relief to farmers: Collector Papalkar | Agrowon

शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा लाभ द्या ः जिल्हाधिकारी पापळकर

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे. देशाचा अन्नदाता आहे. ही भूमिका लक्षात ठेऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवावी. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे. देशाचा अन्नदाता आहे. ही भूमिका लक्षात ठेऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवावी. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यासाठी शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याबाबत, बँकेचे निरीक्षक व गटसचिव यांचा प्रशिक्षण कार्यक्रम अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटक म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते. शेतकरी सभासदांना या कर्जमुक्ती योजनाचा लाभ पोचविण्याकरिता आधार प्रमाणीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असून, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे गटसचिव यांच्याकडे आधार प्रमाणीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. 

शेतकरी सभासदांनी बँकेचे निरीक्षक, गटसचिव, आपले सरकार पोर्टल सेवा केंद्र किंवा स्वस्त धान्य दुकान येथे संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या प्रसंगी अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी शेतकऱ्यांना सन्मान देऊन, बँकेचे निरीक्षक व सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव आधार प्रमाणीकरणाचे काम युद्धपातळीवर करतील व महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ संपूर्ण पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचवतील, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन शरद वानखडे यांनी केले तर, जी. एस. पाटील यांनी आभार मानले.


इतर ताज्या घडामोडी
अत्यावश्यक सेवेतील शेतीमाल वाहतुकीस...सोलापूर  ः अत्यावश्यक सेवा म्हणून माल वाहतूक...
सिन्नर तालुक्यात गारपिटीच्या तडाख्यात...नाशिक : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दातली...
बेदाणा निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अनुदान...नाशिक: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात...
विरवडे येथील सीना नदीत वाळू उपसा करणारे...सोलापूर  ः विरवडे (ता.मोहोळ) येथे सीना...
‘किराणा मालाचा काळाबाजार बंद करा’नगर ः ‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी अनेक...
पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही...पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार...
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...