अकोले, जि.
ताज्या घडामोडी
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करावा ः इंगोले
नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या यादीत हळद या पिकाचा समावेश करून प्रतिक्विंटल १० हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केली आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यांत हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. केळी, ऊस या पिकांपेक्षा कमी पाण्यात, कमी दिवसांत येणारे नगदी पीक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे वळले आहेत. परंतु, हळदीला शासकीय हमीभाव नसल्याने अनेक वेळा व्यापा-यांकडून शेतक-यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. कधी पंधरा ते वीस हजार रुपये क्विंटल, तर कधी तीन ते चार हजार रुपये क्विंटल दर होत असल्याने या पिकाच्या दराबाबत शेतक-यांना नेहमी चिंता असते. त्यामुळे सरकारने हमीभावाने शेतक-यांची हळद खरेदी करावी.
साठवण करून ठेवावी. आहारासोबतच औषधे, सौंदर्यप्रसाधनांसाठी जगभरातून हळदीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सरकारला हळदीला हमीभाव देणे सहजशक्य आहे. हळदीला हमीभाव जाहीर केला, तर शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल. बाजारपेठांतील हळदीचे दर स्थिर राहतील. हळदीच्या हमीभावाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच सर्वपक्षीय आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते तथा ऊस दरनियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.
- 1 of 1022
- ››