agriculture news in marathi give thirty six thousand rupees compensation for banana crop insurance | Page 4 ||| Agrowon

केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या : खासदार पाटील

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने हेक्टरी ३६ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी राज्याचे कृषी आयुक्त यांच्याकडे केली आहे. 

जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून (हवामानावर आधारित) २०२०-२१ साठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना अत्यल्प परतावे मंजूर झाले. केवळ १३५०० रुपये प्रतिहेक्टरी देण्यात आली असून, उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने हेक्टरी ३६ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी राज्याचे कृषी आयुक्त यांच्याकडे केली आहे. 

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून २०२०-२१ मध्ये जळगाव तालुक्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांचे क्लेम सेटल झाले आहेत. जळगाव तालुक्यात भोकर महसूल मंडळातील पात्र ३०९१ शेतकऱ्यांना सहा कोटी २७ लाख ६४ हजार ६६० रुपये परतावा मंजूर झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातून घेतलेल्या जळगाव जिल्ह्यातील मार्च, एप्रिल व मे या महिन्यांतील तापमानाच्या (महावेध) नोंदीनुसार परतावे हेक्टरी ३६ हजार रुपये एवढे मिळायला हवेत. पण कंपनीने भोकर मंडळातील शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी १३ हजार ५०० रुपये परतावा मंजूर केला आहे. तापमानाच्या (महावेध) अहवालानुसार जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळाचे तापमान २६ मार्च ते १३ मार्च २०२१ या कालावधीत सलग सहा दिवस ४२ अंश सेल्सीअसपेक्षा जास्त असल्याचे दिसते. संदर्भ शासन निर्णयानुसार या कालावधीतील नुकसानभरपाईची किंवा परतावा रक्कम नऊ हजार रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे असणे आवश्यक आहे. 

तसेच २५ एप्रिल २०२१ ते २ मे २०२१ या कालावधीत आठ दिवस व ४ मे २०२१ ते १२ मे २०२१ या कालावधीत नऊ दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे कळते. या कालावधीतील तापमानासंबंधी नुकसान परतावा रक्कम १३ हजार ५०० रुपये व मे महिन्यातील तापमानासंबंधी १३ हजार ५०० रुपये रक्कम मंजूर होण्याची अपेक्षा आहे. यानुसार हेक्टरी एकूण ३६ हजार रुपये परतावा या मंडळातील शेतकऱ्यांना मिळायला हवा. पण फक्त १३ हजार ५०० रुपये परतावा रक्कम मंजूर झाली आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासन, शासनाने लक्ष देऊन याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...
सोयाबीन बाजार सुधारलागेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय...
मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती :...मुंबई : आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (...
कागलच्या जनावरांच्या बाजाराला मिळतोय...कागल  : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार...
Big Breaking - बैलगाडा शर्यतींना...नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील बैलगाडा...
इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या...नाशिक  : लाल कांद्याची (Red Onion) आवक...
शिर्डीत सहकार परिषद; केंद्रीय...शिर्डी : पहिला सहकारी साखर कारखाना, अशी ओळख...