Agriculture news in marathi Give time to milk producers, dairy directors: Swabhimani Sanghatana | Agrowon

दूध उत्पादक, डेअरी संचालकांना वेळ वाढवून द्या :स्वाभिमानी संघटना

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

दूध वितरणासाठी दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी देण्यात आलेली वेळ अडचणीची आहे, वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

बुलडाणा : अमरावती विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार कोरोना नियंत्रणासाठी अंशतः लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दूध वितरणासाठी दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी देण्यात आलेली वेळ अडचणीची आहे, वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची भेट घेऊन या बाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कानावर घातल्या आहेत. 

तुपकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राममूर्ती यांची भेट घेतली. आयुक्त पियुष सिंग यांच्याशीही चर्चा केली. लॉकडाऊनच्या काळात सकाळी नऊ ते दुपारी पाच, अशी वेळ ठरवून दिली आहे. या ठरवून दिलेल्या वेळेत दूध वितरण करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि डेअरी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

वेळेची मर्यादा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दूध साठवणुकीची अडचण आहे. तसेच गायींच्या आणि म्हशींच्या कासेत फारकाळ दूध ठेवू शकत नाही.

त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि डेअरी व्यावसायिकांना दूध वाटप आणि वितरण करणे शक्य नाही. त्यामुळे वितरण वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्‍नावर मार्ग काढणार असल्याची ग्वाही दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...