agriculture news in Marathi give training to farm worker from POCRA Maharashtra | Agrowon

`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत  (पोकरा)सहभागी विविध गावांमधून शेतमजुरांसाठी शेती शाळेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे.

औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत  (पोकरा)सहभागी विविध गावांमधून शेतमजुरांसाठी शेती शाळेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे. तशा सूचना प्रकल्प प्रमुख विकास चंद्र रस्तोगी यांनी पत्राद्वारे शनिवारी (ता. १) प्रकल्पाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची सखोल माहिती हवी या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून सहभागी गावांमध्ये खरीप व रब्बी हंगामात मुख्य पिकांच्या शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले गेले होते. या माध्यमातून विविध वेबिनारचेही आयोजन केले गेले होते. शिवाय शेतीशाळांच्या दोन्ही हंगामातील नियोजनानुसार खरिपातील शेतीशाळा सद्यःस्थितीत सुरू आहेत. 

या शेती शाळांमध्येच शेतमजुरांना देखील प्रशिक्षण देण्याबाबत प्रकल्पाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. ऑगस्टपासूनच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कृषिमंत्री भुसे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालकांना यासंदर्भात सूचना केली होती. 

शेतीविषयक कामे करताना शेतमजुरांची कष्ट कमी करणे, संभाव्य इजा टाळणे, कामाची गती वाढविणे आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी शेतमजुरांना विशिष्ट कौशल्याची गरज असते हे लक्षात घेऊन प्रकल्पात सहभागी गावातील शेतीवर काम करणाऱ्या मजुरांना गरजेनुसार कौशल्य शिकविण्याची सोय करण्याचे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक श्री. रस्तोगी यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

प्रत्येक गावातील पिकाच्या प्रकारानुसार प्रशिक्षणाचे नियोजन करावे. त्यासंदर्भात ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये चर्चा करावी. प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपले गावाचे समूह सहाय्यक, कृषी सहाय्यक किंवा शेतीशाळा समन्वयक यांच्याशी समन्वय ठेवावा. सुरुवातीलाच कीडनाशके फवारणी तंत्र व घ्यावयाची काळजी याविषयी प्रशिक्षण देण्याची सूचना प्रकल्प संचालक श्री. रस्तोगी यांनी केली आहे.

या संदर्भातील शेती शाळांना ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य व शेतमजुरांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी करण्याचे श्री. रस्तोगी यांनी सूचित केले आहे.

याविषयी दिले जाणार प्रशिक्षण

  • कीडनाशके फवारणी तंत्र व घ्यावयाची काळजी 
  • फळबागांची निगा (छाटणी, झाडांना वळण देणे, संरक्षित सिंचन, खत घालण्याची योग्य पद्धत)
  • पिकाची काढणी व स्वच्छ कापूस वेचणीसाठी महिलांना आवश्यक कौशल्य 
  • भाजीपाला व फळांची काढणी प्रतवारी व पॅकिंग करणे 
  • कृषी अवजारे चालविणे व देखभाल करणे 
  • रोपवाटिकेतील कामे करणे

प्रतिक्रिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सूचना, संकेत पाळून कौशल्य प्रशिक्षणाचा उपक्रम राबवावा. यासाठी कृषी विभागाचे यंत्रणेचे सहकार्य घ्यावे. प्रकल्पाच्या सहाय्याने आपल्या गावातील शेतमजुरांची क्षमता वाढवण्यासाठी आणि आपले गाव हवामान अनुकूल करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- विकास चंद्र रस्तोगी, प्रकल्प संचालक, पोकरा


इतर अॅग्रो विशेष
राज्यात यंदा सोळा टक्के अधिक पाऊसयंदा हवामान विभागाने चांगल्या पाऊस मानाचे संकेत...
विशेष संपादकीय : आंदोलनाच्या वावटळीत...कृषी पणन क्षेत्रातील सुधारणांचा मुखवटा असलेली...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात काढलेले...परभणी : दोन, तीन दिवासांच्या उघडीपीनंतर बुधवारी (...
सोयाबीन बियाणे कंपन्या कारवाईला आव्हान...पुणे : सोयाबीन बियाणे प्रकरणी थेट परवाने रद्द...
शिक्षण, संशोधन हितासाठीच बदल्यांना...पुणे : शासनाचे आर्थिक हित व कृषी शिक्षण,संशोधनाचे...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांसाठी ३१...मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा...पुणे : राज्यातील काही भागात पावसासाठी...
जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत...अकोला : गुजरातमधील बोताड आणि कच्छ या...
जालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबरपर्यंत...मुंबई : जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे...
बाजार समिती आवाराबाहेर सेस वसुलीबाबत...पुणे : बाजार समितीच्या आवाराबाहेर शेती...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
पणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई  : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...
शेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...
माॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...
शेतमाल खरेदीत सुधारणा कधी?कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...
शेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...