‘अक्‍कलपाडा’तून पांझरेत पाणी सोडा; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

‘अक्‍कलपाडा’तून पांझरेत पाणी सोडा; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
‘अक्‍कलपाडा’तून पांझरेत पाणी सोडा; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कापडणे, जि. धुळे : पांझरा नदी काठच्या न्याहळोद, कौठळ, तामसवाडी, हेंकळवाडी, वरखेडी, कुंडाणे, शिरडाणे, जापी, विश्वनाथ, मोहाडी, कापडणे, धनूर, शिंदखेडा तालुक्‍यातील कंचनपूर, वालखेडा, अजंग, बेटावद, पढावद आदी गावांत पाणीपुरवठा करणारे स्रोत विहिरी, कूपनलिकांची पातळी खालावत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. टंचाई गंभीर होण्यापूर्वीच अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरेत सोडण्याची मागणी करणारे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन यांना दिले. 

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे, हेंकळवाडीचे सरपंच भास्कर पाटील, न्याहळोद येथील ज्ञानेश्वर रोकडे, नाना माळी, जगदीश पाटील, प्रकाश माळी आदी उपस्थित होते. पांझरा नदीकाठच्या गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. पांझरा नदीवर अवलंबून असणारे स्रोत आटू लागले आहेत. ही समस्या गंभीर होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. आधीच उपाययोजना म्हणून अक्कलपाडा धरणाचे पहिले आवर्तन पांझरेत सोडावे. दरम्यान, सभापती खलाणे यांनी पांझरेला पाणी सोडण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेत चर्चा केली. खासदार डॉ. भामरे यांनी पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्याचे खलाणे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com