मराठवाड्याला पाणी देण्यासाठी पर्याय शोधा : जयंत पाटील

मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा अभ्यास करा. या टंचाईग्रस्त भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधा, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
मराठवाड्याला पाणी देण्यासाठी पर्याय शोधा : जयंत पाटील To give water to Marathwada Find an alternative: Jayant Patil
मराठवाड्याला पाणी देण्यासाठी पर्याय शोधा : जयंत पाटील To give water to Marathwada Find an alternative: Jayant Patil

मुंबई  : मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा अभ्यास करा. या टंचाईग्रस्त भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधा, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी (ता. २०) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत मंगळवारी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक पार पडली. या बैठकीत भराडी बृहत् लघू पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.  या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघू प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, तालुक्यातील नवीन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्त करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी चर्चाही बैठकीत करण्यात आली. दरम्यान, सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com