‘निम्न दुधना’च्या दोन्ही कालव्यांद्वारे पाणी आवर्तन द्या

‘निम्न दुधना’च्या दोन्ही कालव्यांद्वारे पाणी आवर्तन द्या
‘निम्न दुधना’च्या दोन्ही कालव्यांद्वारे पाणी आवर्तन द्या

सेलू, जि. परभणी ः या वर्षी तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्याने खरिपाची पिके गेली. तर पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नाही. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांद्वारे दोन पाणीपाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी दबाव गटाच्या वतीने सोमवारी (ता. ५) सेलू येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार आसाराम छडीदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीचे निवेदन पाठविण्यात आले.

अल्प पावसामुळे सेलू तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बीची पेरणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या पशुधनांना चारा मिळणे कठीण झाले आहे. दुधना प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या डाव्या तसेच उजव्या कालव्याव्दारे पाणी सोडले, तर ज्वारीची पेरणी करता येईल. चारा पिके घेता येतील.

जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे डाव्या तसेच उजव्या कालव्यात तत्काळ पाणी सोडण्यात यावे, मागणीसाठी सेलू येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये दबाव गटाचे निमंत्रक अॅड. श्रीकांत वाईकर, अॅड. टी. ए. चव्हाण, ओमप्रकाश चव्हाळ, प्रकाश देशमुख, दत्तराव आंधळे, विलास रोडगे, दिलीप मगर, एकनाथ काकडे, विठ्ठल काळे, सोनू शेवाळे, इसाक पटेल, जयसिंग शेळके, उदय पावडे, बाबा भाबट, पुंजाराम शेवाळे, आदींसह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

या रास्ता रोकोमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार आसाराम छडीदार यांना मागण्याचे निवेदन देऊन रास्ता रोको स्थगित करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com