Agriculture News in Marathi Given to group farming Misuse of grants | Page 3 ||| Agrowon

गट शेतीला दिलेल्या  अनुदानाचा गैरवापर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021

कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या गटशेतीच्या संकल्पनेला काही जिल्ह्यांत बट्टा लागला आहे. सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतरही २२९ गटांनी कामे पूर्ण केलेली नाहीत.

पुणेः कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या गटशेतीच्या संकल्पनेला काही जिल्ह्यांत बट्टा लागला आहे. सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतरही २२९ गटांनी कामे पूर्ण केलेली नाहीत, असे शासनाच्या एका चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ४६ गटांनी अनुदान घेत एक रुपयाचे देखील काम केलेले नाही.

या गटांना भरीव आर्थिक मदत देणारी किंवा विविध उपक्रमांना चालना पुढे एकही योजना राबविली गेली नाही. ‘‘गट शेतीच्या सबलीकरणाची संकल्पना पहिल्या टप्प्यात शासनानेच हाणून पाडली. त्यानंतर पुन्हा गट शेतीचा बोलबाला होताच २०१७मध्ये सुधारित धोरण आणून गट शेतीसाठी कोट्यवधी रुपये देण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यात संनियंत्रण, लेखापरीक्षण, तपासणी हा भागच नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी गटांनी केवळ कागदोपत्री प्रकल्प दाखवून अनुदान घेतले आणि प्रत्यक्षात कामे केली नाही. राज्यस्तरीय चौकशी झाल्यानंतर ही बाब आता उघड झाली आहे,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

शासनाचा मूळ हेतू चांगला
समूह शेतीच्या प्रकल्पांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाचा मूळ हेतू मात्र चांगला आहे. कारण, गट शेती करणाऱ्या समुहांना शेततळे, सूक्ष्म सिंचन, उपसा सिंचन, खासगी विहीर, पंपसेट, पाइपलाइन, यांत्रिकीकरण, गोदामे, पीक संरक्षण अवजारे, काढणी पश्चात प्रक्रिया व हाताळणी, विपणन अशा विविध उपक्रमांना राज्याच्या तिजोरीतून अनुदान दिले गेले आहे. २०१७ ते १९ या कालावधीत ४०० गटांना अनुदान देण्याचे ठरविण्यात आले होते. २०१७-१८ मध्ये ४५ कोटी रुपये या गटांना वाटण्याचे ठरविले गेले. त्यात सामुदायिक घटकाच्या प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के अनुदान व २५ टक्के अनुदान वैयक्तिक कामांसाठी होते.

प्रत्येक गटाला एक कोटी रुपये देण्याचे आधी शासनाने घोषित केले. परंतु, खरे गट कोणते आणि खोटे गट कोणते याची काटेकोर पडताळणी करणारी यंत्रणाच नव्हती. त्यामुळे अनेक बोगस गट देखील उदयाला आले. त्यात पुन्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गटांची तपासणी काळजीपूर्वक केली नाही. त्यामुळे चुकीच्या गटांना पैसा वाटला गेला, असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या गावपातळीवर सोडविण्यासाठी गट शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे, तसेच अस्तित्वात असलेल्या शेतकरी गटांचे सबलीकरण देखील करावे, अशा सूचना विविध अभ्यासांमधून एक दशकापूर्वी मांडल्या जात होत्या. शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे गाजू लागल्यानंतर गट शेतीच्या सबलीकरणाचा विषय अधिक जोमाने पुढे आला. त्यामुळे गट शेतीला चालना देणारे धोरण २०१३-१४ वर्षांत शासनाने स्वीकारले.

कागदोपत्री तयार झाले गट
गट शेतीला चालना देण्याचे धोरण स्वीकारले गेले खरे; मात्र पूर्ण राज्यासाठी निधी अवघा ११ लाखांचा देण्यात आला. त्यामुळे ‘आत्मा’च्या अखत्यारित केवळ कागदोपत्री गट तयार झाले. 

चांगले काम करणाऱ्या गटांचा निधी रोखला
या गोंधळात काही गटांनी मात्र उत्तम कामे केलेली आहेत. तथापि, चौकशीचा ससेमिरा लागल्याने चांगल्या गटांचा निधी देखील रोखला गेलेला आहे. चौकशीत दोषी आढळलेल्या गटांबरोबरच चांगल्या गटांचे अनुदानही रखडलेले आहे. उत्तम कामे करणाऱ्या गटांचे अनुदान तत्काळ या गटांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे आव्हान आता कृषी खात्यासमोर आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...