Agriculture news in marathi, Giving a lump sum FRP Not possible to factories | Agrowon

एकरकमी ‘एफआरपी’ देणे कारखान्यांना नाही शक्य

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

माळीनगर, जि. सोलापूर ः ‘‘एकरकमी एफआरपी देणे कोणत्याच कारखान्याला शक्य होत नाही. त्याबाबत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांचाही विचार करायला हवा’’, असे मत दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी व्यक्त केले.

माळीनगर, जि. सोलापूर ः ‘‘साखरेची विक्री वेळेत होत नाही. त्याबरोबर इथेनॉल व को-जनची बिले साखर कारखान्यांना वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिणामी, एकरकमी एफआरपी देणे कोणत्याच कारखान्याला शक्य होत नाही. त्याबाबत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांचाही विचार करायला हवा’’, असे मत दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी व्यक्त केले.

माळीनगर साखर कारखान्याच्या ८९ व्या गाळप हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक सतीश साबडे व सतेज पैठणकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी गिरमे बोलत होते. या प्रसंगी संचालक राहुल गिरमे, मोहन लांडे, विशाल जाधव, निळकंठ भोंगळे, निखिल कुदळे आदी उपस्थित होते.

गिरमे म्हणाले, ‘‘दर महिन्याला तयार होणाऱ्या सर्व साखरेची विक्री होत नाही. महिन्यात कोट्यानुसार ३० ते ३५ टक्के साखरेच्या विक्रीला केंद्राकडून परवानगी मिळते. एफआरपीची शंभर टक्के रक्कम देण्याबरोबरच ऊसतोडणी, वाहतूक, कामगारांचे पगार, ऑफ सीझनची उधारी, मेंटेनन्स आदी खर्च कारखान्यांना असतो. कोजनची बिले दोन-दोन महिने मिळत नाहीत. इथेनॉलची १२ महिने साठवणूक करावी लागते. त्याची विक्री झाल्यावर एक महिन्याने पैसे मिळतात. इथेनॉलचे करार झाल्यावर सरकारने त्यावर ॲडव्हान्स द्यावा. साखरेचा उत्पादन खर्च ३७०० ते ३८०० रुपये आहे. तीन हजार रुपयांच्या दरम्यान साखरेची विक्री किंमत आहे. उत्पादन खर्च व विक्री किंमत याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत एकरकमी एफआरपी देणे शक्य होऊ शकत नाही.’’
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...