लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्न

अमेरिकन लष्करी अळी
अमेरिकन लष्करी अळी

पुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच मक्यावरील लष्करी अळी ही जागतिक समस्या झाली आहे. अन्न आणि कृषी संघटनेचा कृतिशील कार्यक्रम, आफ्रिका, अमेरिका खंडातील देशांकडून रासायनिक, जैविक उपायांचा उपयोग, संशोधन, मार्गदर्शनपर पोर्टल, संकेतस्थळे, ॲप्स आदींचा वापर याद्वारे ही कीड नियंत्रणात ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न अन्य देशांसाठी अनुकरणीय ठरले आहेत. स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा अर्थात मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी (FAW) ही जागतिक समस्या झाली आहे. मका हे या अळीचे मुख्य पीक आहे. त्याचबरोबर ऊस, ज्वारी आदी पिकांतही या किडीचे अस्तित्व आहे. मका हे मुख्य पीक असलेल्या आफ्रिकी व दक्षिण अमेरिकी देशांत या अळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपक्रम राबवण्यात आले आहेत. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. बी. भेदे म्हणाले की, अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) या किडीच्या नियंत्रणात महत्त्वाचा पुढाकार घेतला. आफ्रिका खंडातील देशातील संबंधित संस्थांना  एकत्रित आणून अळीच्या नियंत्रण व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला. यासंबंधीच्या विविध प्रकल्पांत सहा मुख्य घटकांवर भर दिला आहे. यात ताबडतोब करावयाच्या शिफारशी व उपाययोजना, कमी कालावधीत करावयाचे संशोधन, संपर्क व प्रशिक्षण, सर्वेक्षण व त्वरीत ॲलर्ट, धोरण व नियमनात मदत आणि समन्वय या घटकांचा समावेश आहे.   पोर्टलद्वारे जागृती 

  • डॉ. भेदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी अळीसंबंधी ‘FAW Portal’
  • त्यात विविध देशांतील लष्करी अळीची परिस्थिती व व्यवस्थापनाबद्दल माहितीचा समावेश
  • अमेरिका कृषी विभागातील शास्त्रज्ञांकडून (USDA) फार पूर्वीपासून या किडीवर संशोधन
  • सद्यस्थितीत अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून रासायनिक व जैविक अशा एकात्मिक पद्धतीचा वापर
  • त्याचबरोबर कीटकनाशकांचा योग्य वापर आणि जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून या अळीचे नियंत्रण शेतकरी करीत आहेत.
  • सन २०१६ मध्ये आफ्रिका खंडामध्ये या किडीचा प्रवेश. कीड नवी असल्याने नियंत्रणाचे उपाय करण्याबाबत तेथे फारशी माहिती नव्हती. अमेरिकेतील संशोधनाचा वापर करून आफ्रिकी देशातील शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती पुरविण्यात आली.  
  • संयुक्त उपक्रमाद्वारे पुस्तिका ‘फीड दी फ्युचर’ या उपक्रमाद्वारे यूएसएआयडी ही आंतरराष्ट्रीय विकास संस्था, मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र (सीमीट), विकसनशील देशांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांची समूह संस्था ‘सीजीआयएआर’ तसेच ‘सीआरपी मेझ’ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने याविषयीची पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. ‘यूएसएआयडी’ ही संस्था ‘फीड दी फ्युचर’ या उपक्रमाद्वारे लष्करी अळीविषयी आफ्रिकी देशांतील शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे काम करते आहे. नियंत्रणाच्या पद्धती सांगून नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार करते आहे. विविध देशांतील शासन, संशोधन संस्थांच्या समन्वयातून अळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी बळकटी येत आहे. शासकीय व खासगी संस्थांना एकत्रित आणून अळीच्या नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय संघटन करण्यामध्ये सीमीट संस्थेचा पुढाकार आहे, अशीही माहिती श्री. भेदे यांनी दिली. 

    ठळक बाबी 

  • अळीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शास्त्रीय कौशल्य आणि उपयुक्त साहित्य पुरवण्यामध्ये कॅबी या संस्थेचे सहकार्य 
  • प्रतिबंधक उपाय, सुरुवातीच्या प्रादुर्भावाचा शोध आणि व्यवस्थापन याबाबत आधुनिक तंत्र विकसित 
  • -www.plantwise.org या संकेतस्थळाद्वारे प्रशिक्षित तज्ज्ञांकडून मार्गदर्शन 
  • केस्टर विद्यापीठ, इंग्लंड यांच्यामार्फत www.armyworm.org या संकेतस्थळाद्वारे आफ्रिका देशांतील शेतकरी, शास्त्रज्ञ, शासन व प्रसारमाध्यमांना नियमित माहिती पुरवठा 
  • यात अळीबाबतच्या घडामोडी, बातम्या, नवीन सुधारणा, प्रादुर्भावाचा अंदाज, शास्त्रीय माहिती व चित्रफिती यांचा समावेश
  • केनियातील कृषी व सिंचन मंत्रालय आणि काही संस्थांच्या समन्वयाने शेतकऱ्यांसाठी मोबाईलद्वारे संदेश पाठविण्यात येत आहेत.
  • इंटरनॅशनल सेंटर ऑफ इनेस्क्ट फिजीऑलॉजी ॲण्ड इकॉलॉजी’ या केनयास्थित 
  • केंद्राद्वारे आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लष्करी अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबद्दल 
  • तंत्रज्ञान 
  • कृषी परिसंस्था, पीक पद्धती, लष्करी अळीचे नैसर्गिक शत्रू यांचा एकत्रित विचार करून तंत्रज्ञानाचा विकास
  • अळीच्या नियंत्रणासाठी कोटेशिया, पॅलेक्झोरिस्टा, कॅरोप्स या मित्रकीटकांच्या प्रजातीची नोंद  
  • हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेत परोपजीवी मित्रकीटक ट्रायकोग्रामा व टीलोनेमस याबाबत संशोधन 
  • लष्करी अळीला प्रतिकारक्षम वाण, निंबोळीवर आधारित तसेच रासायनिक कीटकनाशके याविषयीही संशोधन सुरू
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com