नाशिकच्या वैभवशाली इतिहासाला मिळणार उजाळा

The glorious history of Nashik will be bright
The glorious history of Nashik will be bright

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेस दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मे महिन्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास आणि प्रगतीचे टप्पे मांडले जाणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उपक्रमात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नर्सीकर आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी श्री. मांढरे म्हणाले, की १८७० मध्ये जिल्ह्याची निर्मिती झाली. पूर्वी बागलाण प्रांत नगर जिल्ह्यात समाविष्ट होता. ओव्हन्स हे जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी होते. त्यानंतर काथावाला आणि अलमौला हे पहिले भारतीय जिल्हाधिकारी झाले. पिंपरूटकर यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिले मराठी जिल्हाधिकारी लाभले. चांदवड हे त्या काळात महत्त्वाचे केंद्र होते. शहरात सृजनशिलता मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्याने प्रगतीचे अनेक टप्पे अनुभवले आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जगासमोर आणताना नाशिकचे ब्रँडीगही होणे गरजेचे आहे. हवामान, संस्कृती, कला, क्रीडा, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रांत जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. जिल्ह्याला १५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही ओळख अधिक प्रभाविपणे देशपातळीवर पोचविण्यासाठी कायमचे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यापुढील काळात देखील असे प्रयत्न कायम रहावेत, यादृष्टीने नाशिककरांचा आयोजनात उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमास सहकार्य करण्याचे मान्य केले असून प्रत्येकाने आपला कार्यक्रम म्हणून यात जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉफीटेबल बुक आणि विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून नाशिकची माहिती नागरिकांसमोर मांडण्याचा मनोदय श्री. मांढरे यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com