Agriculture News in Marathi For GM technology Resolutions to be taken by villages | Page 4 ||| Agrowon

जीएम तंत्रज्ञानासाठी  गावांनी घ्यावेत ठराव 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

सर्वच क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची मागणी आणि स्वागत होत असताना कृषी क्षेत्रात मात्र जीएम तंत्रज्ञानाला विरोध केला जात आहे. हा प्रकार अन्यायकारक आहे. 

यवतमाळ : सर्वच क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची मागणी आणि स्वागत होत असताना कृषी क्षेत्रात मात्र जीएम तंत्रज्ञानाला विरोध केला जात आहे. हा प्रकार अन्यायकारक असून, जीएम चाचण्यांवरील बंदी उठविण्याकरिता प्रत्येक गावातून ग्रामसभेचा ठराव घ्या आणि तो केंद्र सरकारला पाठवा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केले आहे. 

सुरक्षित फवारणी विषयक कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. वागद ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ही कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाला किर्तीराज चिद्दरवार, सुरेश राठोड, अविनाश राठोड, डाखोरे उपस्थित होते. मनीष जाधव म्हणाले, ‘‘देशात आज ९९ टक्‍के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड होते. अवघ्या एक टक्‍के क्षेत्रावरच सरळ वाणाचा उपयोग केला जातो. बीटी जीनचा समावेश असलेल्या कापूस वाणांमुळे उत्पादकता वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

कीडरोगांचा प्रादुर्भाव देखील यावर कमी होतो. रसशोषक किडीचे प्रमाण या तंत्रज्ञानामुळे नियंत्रणात आल्याने शेतकऱ्यांवर फवारणीवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली. मात्र पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे केंद्र सरकारने जनुकीय (जीएम) तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या वाणाच्या संशोधनावर बंदी घातली आहे.

परिणामी शेतकऱ्यांना कालबाह्य झालेल्या बीटी तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागत आहे. दहा वर्षापेक्षा अधिकचा कालावधी बीटी तंत्रज्ञानाला झाल्याने त्यातून अपेक्षीत परिणाम साधला जात नाही. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना जनुकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी चाचण्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी मनीष जाधव यांनी केली. याकरिता गावस्तरावर ठराव घेण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी देखील पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 
 


इतर बातम्या
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...
अनुदानित हरभरा बियाणे उपयोगात आणावे :...नाशिक : ‘‘राज्यात २४ ऑक्टोबरपर्यंत हरभरा प्रमाणित...
नांदेड जिल्हा बॅंकेची मदार २३०...नांदेड : नांदेड जिल्हा बॅंकेत कर्मचाऱ्यांची वानवा...
किसान रेल्वेला सोलापुरातून प्रतिसादसोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून किसान...
खानदेशात रब्बीसाठी पीककर्जाचे वितरण सुरूजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे....
धर्माबादेत डीएपीची खताची कृत्रीम टंचाईनांदेड : धर्माबाद येथील कृषी सेवा केंद्र चालक...
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...