agriculture news in marathi, gm technology is useful for economical devlopment, akola, maharashtra | Agrowon

‘देशाच्या अर्थिक संपन्नतेसाठी जैव तंत्रज्ञान आवश्‍यक‘
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

अकोली जहाँगीर, जि. अकोला   ः  जैव तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी निर्माण होईल. तसेच जनुक संशोधित बियाणे पर्यावरणपूरकच आहेत, असा सूर शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाप्रसंगी मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाला.

अकोली जहाँगीर, जि. अकोला   ः  जैव तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी निर्माण होईल. तसेच जनुक संशोधित बियाणे पर्यावरणपूरकच आहेत, असा सूर शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाप्रसंगी मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाला.

जैव तंत्रज्ञानाच्या मान्यतेबाबत सरकारच्या अनास्थेला कंटाळून अकोली जहाँगीर येथील शेतकरी ललित बहाळे यांनी एचटीबीटी कापूस व वांग्याच्या बियाण्याची पेरणी केली. अलीकडेच हरियाना येथे दोन शेतकऱ्यांना जीएम वांग्यांची लागवड केल्याबद्दल दोषी ठरवून त्यांच्या शेतातील पीक प्रशासनाने नष्ट केले होते. अकोली जहाँगीर येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांची संपत्ती नष्ट केल्याबद्दल व नुकसान केल्याबद्दल त्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी संकलनाचे आवाहन करण्यात आले. 

या वेळी ललित बहाळे म्हणाले, की शेतकरी मागील काही वर्षांपासून चोरून एचटीबीटी कापसाची लागवड करत आहेत. या सत्याग्रहामुळे आम्ही अभिमानाने या बियाण्यांची लागवड करू. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेतीक्षेत्रातील अवाजवी बंधने नाकारण्यासाठी बळ देण्याकरिता हा सत्याग्रह आहे. तंत्रज्ञान निवडीच्या शेतकऱ्यांच्या मागणीला या सत्याग्रहामुळे बळ मिळणार आहे.

शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख अजित नरदे म्हणाले, की जीएम तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. तेलबियांमधील जनुक तंत्रज्ञानामुळे आपण खाद्यतेलाची आयात कमी करू शकू. पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे निर्माण होईल.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, की जगभरात डझनभरापेक्षा अधिक पिकांत जनुक संशोधित तंत्रज्ञानाचे बियाणे वापरले जाते. मका, कापूस, सोयाबीन, मोहरी अशा अनेक पिकांत जनुक संशोधित बियाण्यांचा वापर केला जातो. मानवासह जनावरेदेखील गेल्या दोन दशकांपासून या बियाण्यांपासून उत्पादित अन्नाचे, चाऱ्याचे सेवन करत आहेत; परंतु कोणाच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. एकीकडे जनुक संशोधित बियाण्यांमुळे पर्यावरण प्रदूषित होत असल्याचा दावा केला जातो, उलटपक्षी जनुक संशोधित बियाण्यांमुळे कीटकनाशकांचा वापर कमी होत असल्यामुळे ते पर्यावरणपूरकच आहेत.  

या वेळी जिंतूर (जि. परभणी) येथील गजानन देशमुख, श्रीगोंदा तालुक्यातील (जि. नगर) शेतकरी अनिल चव्हाण, यवतमाळ जिल्ह्यातील गोविंद रामदास शहाणे, तसेच हरियाना राज्यातील फतेहबाद जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांनी आपले अनुभव कथन केले.

इतर ताज्या घडामोडी
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...