जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या शेताचे `जीओ टॅगिंग`

हवामान अनुकूल कापूस उत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना गरजेच नेमके तंत्रज्ञान पोचविण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नेमका निर्णय घेणे शक्‍य होईल, ती काळाची गरज आहे. हवामान बदलाचे धोके ओळखून खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने ‘डब्ल्यू डब्ल्यू एफ-इंडिया’च्या मदतीने हे पाऊल टाकले आहे. - एस. व्ही. सोनुने, प्रमुख, केव्हीके, खरपुडी, जि. जालना.
जीओ टॅगिंग
जीओ टॅगिंग

जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल कापूस उत्पादन प्रकल्प राबविला जात आहे.  या प्रकल्पांतर्गत ३० हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी २० हजार शेतकऱ्यांच्या शेताची अक्षांश रेखांशासह भौगोलिक नोंदणी (जीओ टॅगिंग) करण्यात आली आहे. उरलेल्या १० हजार शेतकऱ्यांच्या शेताच्या भौगोलिक परीक्षणाचे काम प्रगतिपथावर आहे. शिवाय या प्रकल्पांतर्गत सहभागी शेतकऱ्यांच्या दिमतीला ''कॉटन डॉक्‍टर'' नावाच्या ॲप सोबतच आता राज्यात व देशात प्रथमच उभारणी केलेल्या ''किऑस्क'' ही देण्यात आले आहे.  जागतिक निसर्ग निधी(wwf-india) या आंतरराष्‌ट्रीय संस्थेच्या सहकार्याने मराठवाडा शेती साह्य मंडळांतर्गत खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र व केशवराज ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी यांच्या वतीने जालना जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल कापूस उत्पादन प्रकल्प(wrcp) राबविला जात आहे. कापूस पिकातील अचूक सिंचन व्यवस्थापन, हवामान अंदाजासह दैनंदिन कापूस पीक शेती सल्ला आणि मृद व जलसंधारण हे या प्रकल्पाचे चार प्रमुख उद्‌देश आहेत. या प्रकल्पांतर्गत ३० हजार नोंदणीकृत शेतकरी असून, त्यापैकी २० हजार शेतकऱ्यांच्या शेताचे भौगोलिक नोंदणी(Geo-tagging) करून प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या शेतातील पीक परिस्थिती, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण आणि कीड रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण याबाबत माहिती संकलित करण्यात आली आहे. उर्वरित १० हजार शेतकऱ्यांच्या शेताचे Geo-tagging करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने देण्यात आली.  अद्ययावत तंत्रज्ञानाशी शेतकऱ्यांची सांगड घालताना डब्ल्यू डब्ल्यू एफ-इंडिया’द्वारे प्रकल्पातील स्मार्टफोनचालक शेतकऱ्यांसाठी ''कॉटन डॉक्‍टर''  नावाचे मोबाईल ॲप व तसा फोन नसलेल्यांसाठी ''फार्मर किऑस्क''ची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पांतर्गत १६ गावांत आधीच स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. ॲपचा शुभारंभ व किऑस्कचे उद्‌घाटन १५ ऑगस्टला जालनाचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त भगवानराव काळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने, डब्ल्यू डब्ल्यू एफ-इंडिया’चे मुकेश त्रिपाठी, जालनाचे तालुका कृषी अधिकारी सुखदेवे, प्रगतिशील शेतकरी उद्धव खेडेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी विजयअण्णा बोराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, मुकेश त्रिपाठी यांच्यासह उद्धव खेडेकर यांनी मार्गदर्शन केले.  'कॉटन डॉक्‍टर' ॲप अन् 'किऑस्क'ही शेतकऱ्यांच्या दिमतीला प्रकल्पांतर्गत स्मार्टफोनचालक शेतकऱ्यांच्या दिमतीला डब्ल्यू डब्ल्यू एफ-इंडिया’द्वारे ''कॉटन डॉक्‍टर'' नावाने मोबाईल ॲप विकसित करून देण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाचे आरोग्य आणि त्या अनुषंगाने करावयाचे व्यवस्थापन या संदर्भात निर्णय घेऊ शकणार आहेत. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी ''फार्मर किऑस्क'' शिवणी (ता. जि. जालना) येथे बसवून देण्यात आले आहे. प्रतिक्रिया प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित ॲपसोबतच किऑस्क शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे कौतुकास्पद आहे. शेतीमधील तंत्रज्ञानाचा वापर निश्चितपणे वाढायला हवा. शिवाय अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा उपलब्ध साधनांच्या आधारे शेतकऱ्यांनी वापरही करायला हवा. हवामान बदलानुसार पीकपद्धतीमध्ये बदल व शेतीचे नियोजन काळाची गरज आहे. - रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com