I transfer my JOSH to you...

I transfer my JOSH to you...
I transfer my JOSH to you...

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांचा उत्साह हा कायमच तरुणांना लाजवेल आणि आपल्या सडेतोड मतांमुळे प्रसिद्ध असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने देश हळहळला. चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. पण, त्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्यात आणखी उर्जा असल्याचे दाखवून दिले होते. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या Hows The JOSHला I transfer my josh to you असे म्हणत त्यांच्यात उत्साह संचारला होता.

पर्रीकर यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज रात्री आठच्या सुमारास त्यांच्या निधनाबाबत माहिती देण्यात आली. पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या आजाराने गेले वर्षभर आजारी होते. अमेरिका, मुंबई आणि दिल्लीतही त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गेले चार महिने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांत पाणी झाल्याने त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास झाला होता, त्यावेळीही त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती प्रसारित झाली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली. 

पर्रीकरांचा थोडक्यात परिचय :

  • मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर
  • गोव्यातील म्हापसामध्ये 13 डिसेंबर 1955 रोजी त्यांचा जन्म झाला
  • पर्रीकरांचे लोयोला हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाले
  • मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.
  • पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि पहिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले
  • पर्रीकर विद्यार्थीदशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते
  • 1994 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले
  • 2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले
  • त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये (2001) ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचे सरकार केवळ दीड वर्ष टिकले
  • जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले
  • 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले
  • पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वांत पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचविले
  • 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली
  • पर्रिकर संरक्षणमंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला
  • गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 
  • पर्रीकरांनी 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com