समूह भावनेतून काम केल्यास उद्दिष्ट साध्य होईल ः माळी

समूह भावनेतून काम केल्यास उद्दिष्ट साध्य होईल ः माळी
समूह भावनेतून काम केल्यास उद्दिष्ट साध्य होईल ः माळी

औरंगाबाद ः समूह भावनेतून गतिमानतेने काम करावे, दिलेल्या वेळेत उद्दिष्ट साध्य करणे शक्‍य होईल, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संचालक धनंजय माळी यांनी केले. विभागातील सर्व ग्रामीण आवास योजनांचा तालुकानिहाय आढावा या वेळी घेतला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (ता. १९) विभागातील सर्व ग्रामीण आवास योजनांची आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीला राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक धनंजय माळी यांच्यासह उपायुक्त सूर्यकांत हजारे, उपायुक्त श्री. पाटोदकर, सहायक आयुक्त अनंत कुंभार यांच्यासह संबंधित उपस्थित होते. 

विभागात सर्व ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये एकूण ४२९९७ उद्दिष्टापैकी पूर्ण घरकुले ११४६२ इतकी आहेत. यामध्ये प्रथमस्थानी औरंगाबाद जिल्ह्यात ४७१२ उद्दिष्टापैकी २१०५ घरकुले पूर्ण असून द्वितीय स्थानावर जालना जिल्ह्यात २७५४ उद्दिष्टापैकी १२२२ घरकुले पूर्ण आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सन २०१८-१९ मध्ये एकूण ५३०७ उद्दिष्टापैकी ११३८ घरकुले पूर्ण झाली. त्यामध्ये उस्मानाबाद १७८ उद्दिष्टापैकी ६६ घरकुले पूर्ण आहेत. 

बीड ६७९ उद्दिष्टापैकी २३२ घरकुले पूर्ण, लातूर ३१८ उद्दिष्टापैकी १०६ घरकुले पूर्ण, औरंगाबाद ९७८ उद्दिष्टापैकी ३०७ घरकुले पूर्ण, जालना ३९५ उद्दिष्टापैकी ११६ घरकुले पूर्ण, परभणी २०८ उद्दिष्टापैकीपूर्ण ५९ घरकुले पूर्ण, हिंगोली ४२१ उद्दिष्टापैकी ९२ घरकुले पूर्ण, तर नांदेड जिल्ह्यात उद्दिष्टाची सर्वात कमी पूर्तता होत असून २१३० पैकी १६० घरकुले पूर्ण असल्याचे समोर आले. 

रमाई आवास योजनेत सन २०१७-१८ मध्ये विभागात २७३१६ उद्दिष्टापैकी ४४६५ घरकुले पूर्ण झालेली असून यामध्ये औरंगाबाद २२०० उद्दिष्टापैकी पूर्ण घरकुले ७१४, जालना उद्दिष्ट १५१० पैकी ४८४ पूर्ण, बीड ४००० पैकी १०९५, हिंगोली ११८७ पैकी २८२, लातूर ४९१९ पैकी १०१४, उस्मानाबाद २००० पैकी २०२, परभणी ८५०० पैकी ६५६ आणि नांदेड जिल्ह्यात ३००० उद्दिष्टापैकी १८ घरकुले पूर्ण झालेली आहेत. शबरी आवास योजनेत विभागात ४०२ उद्दिष्टांपैकी एकूण ६० घरकुले पूर्ण असून पारधी आवास योजनेत सन-२०१७-१८ मध्ये एकूण १३४ उद्दिष्टापैकी विभागात एकूण २२ घरकुले पूर्ण आहेत.

चांगले काम करणाऱ्यांना कौतुकाची थाप विभागात उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने चांगले काम करत असलेल्या अधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. बैठकीस विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com