Agriculture news in Marathi, Goat breeding scheme on the soil of Marathwada: Minister Mahadev Jankar | Agrowon

सातारा जिल्ह्यात मराठवाड्याच्या धर्तीवर शेळीपालन योजना ः जानकर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

सातारा : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहे. मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर २० शेळ्या व एक बोकड ही योजना ५० टक्के अनुदानावर सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पशुसवंर्धन विभागाने पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. 

सातारा : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहे. मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर २० शेळ्या व एक बोकड ही योजना ५० टक्के अनुदानावर सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पशुसवंर्धन विभागाने पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. 

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन मंत्री जानकर यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक- निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. माधव आठवले, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मनोज पवार उपस्थित होते. 

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत असल्याचे सांगून जानकर म्हणाले, ‘‘पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे येत्या काळात भरण्यात येतील. बेरोजगार तरुणांना मत्स्य व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. ज्या महिला बचतगट पशुधनांचा व्यवसाय करत आहेत, अशा बचत गटांना बॅंकांनी वित्तपुरवठा केला पाहिजे, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मेंढपाळ कुटुंबांची जनगणना करून त्यांची सक्तीने विमा उतरविला पाहिजे, त्यांचे काही नैसर्गिक नुकसान झाल्यास त्यांना मदत देता येईल. मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर २० शेळ्या व एक बोकड ही योजना ५० टक्के अनुदानावर सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घ्यावा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय नवीन इमारत ही सुसज्ज इमारत आहे. या कार्यालयाने सौरऊर्जेचा वापर केला आहे. यापुढे पशुसंवर्धन विभागातील सर्व कार्यालये सौरऊर्जेवर करण्याचा मानस आहे.’’ या वेळी पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

पशुसंवर्धनच्या सेवा मोबाईल ॲपद्वारे देणार 
‘‘मोबाईल ॲपवर पशुपालक, शेतकऱ्यांसह त्यांनी सांभाळलेल्या जनावरांची सर्व माहिती घेऊन मोबाईल ॲपद्वारे त्यांच्यापर्यंत पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाच्या सर्व योजना पोचवण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल,’’ अशी माहिती पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली. कऱ्हाड येथील तालुका लघू पशू सर्वचिकित्सालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटनमंत्री जानकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते.


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...