गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा दर्जा फुलशेतीला मिळू लागला आहे.
ताज्या घडामोडी
नगर : शेळी, कुक्कुटपालन योजनेचा दीडशे शेतकऱ्यांना लाभ
नगर ः शेतीसोबत अन्य पूरक उद्योगासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन योजनेचा यंदा जिल्हाभरातील १५७ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यात ४९ लाभार्थी कुक्कुटपालनाचे तर १०८ लाभार्थी शेळीपालनाचे आहेत. मागणीच्या तुलनेत हे उद्दिष्ट मात्र अल्प आहे.
नगर ः शेतीसोबत अन्य पूरक उद्योगासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन योजनेचा यंदा जिल्हाभरातील १५७ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यात ४९ लाभार्थी कुक्कुटपालनाचे तर १०८ लाभार्थी शेळीपालनाचे आहेत. मागणीच्या तुलनेत हे उद्दिष्ट मात्र अल्प आहे.
ग्रामीण भागात शेतकरी, बेरोजगार तरुणांनी शेतीला जोडून अन्य व्यवसाय करावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून शेळीपालन, कुक्कुटपालनाचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. गेल्या काही वर्षांपासून ही योजना राबवली जात आहे. शेळीपालनासाठी सहा शेळ्या व एक बोकड तर कुक्कुटपालनासाठी एक हजार पक्षी देण्याची योजना आहे. यंदा या योजनेतून कुक्कुटपालनाचा जिल्हाभरातील केवळ ४९ लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अकोले तालुक्यातील १०, श्रीगोंद्यातील २ व राहाता तालुक्यातील चार तर कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यांतील प्रत्येकी तीन लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.
शेळीपालनात यंदा १०८ लाभार्थी निवडले जाणार आहेत. त्यात अकोले तालुक्यातील २१, कर्जत, जामखेड तालुक्यातील प्रत्येकी पाच, कोपरगाव, नेवासा, राहाता, शेवगाव तालुक्यांतील प्रत्येकी सहा, पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येकी सात, नगर, पारनेर तालुक्यांतील प्रत्येकी आठ, संगमनेर तालुक्यातील नऊ लाभार्थी निवडले जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेल्या या योजनेला गेल्या काही वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे .
योजनेचा लाभ मिळावा म्हणून दरवर्षी अनेक शेतकरी अर्ज करतात. मात्र, त्या तुलनेत लाभ मिळत नाही. यंदाही हजारो शेतकऱ्यांनी मागणी केलेली असताना योजनेचा लाभ मात्र मोजक्या लोकांना मिळला आहे. उद्दिष्टापेक्षा मागणी जास्त असल्याने सोडत पद्धतीतून जिल्हा निवड समिती लाभार्थी निवड करत असल्याचे सांगण्यात आले.
लक्षांक वाढवून मिळावा
नगरसह राज्याच्या बहुतांश भागात आता शेळीपालन, कुक्कुटपालनाकडे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार केंद्रित झाले आहेत. या व्यवसायाला बॅंका मात्र सहजपणे कर्ज देत नाहीत. शिवाय पशुसंवर्धन विभागातून अनुदानाचा लाभ मिळण्याचा प्रयत्न करण्यासाठी कित्येक वेळा प्रयत्न करुनही लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनसाने लक्षांक वाढवून देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.