agriculture news in marathi, goat farming and poultry scheme status, nagar, maharashtra | Page 3 ||| Agrowon

नगर : शेळी, कुक्कुटपालन योजनेचा दीडशे शेतकऱ्यांना लाभ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नगर  ः शेतीसोबत अन्य पूरक उद्योगासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन योजनेचा यंदा जिल्हाभरातील १५७ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यात ४९ लाभार्थी कुक्कुटपालनाचे तर १०८ लाभार्थी शेळीपालनाचे आहेत. मागणीच्या तुलनेत हे उद्दिष्ट मात्र अल्प आहे.

नगर  ः शेतीसोबत अन्य पूरक उद्योगासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन योजनेचा यंदा जिल्हाभरातील १५७ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यात ४९ लाभार्थी कुक्कुटपालनाचे तर १०८ लाभार्थी शेळीपालनाचे आहेत. मागणीच्या तुलनेत हे उद्दिष्ट मात्र अल्प आहे.

ग्रामीण भागात शेतकरी, बेरोजगार तरुणांनी शेतीला जोडून अन्य व्यवसाय करावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून शेळीपालन, कुक्कुटपालनाचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. गेल्या काही वर्षांपासून ही योजना राबवली जात आहे. शेळीपालनासाठी सहा शेळ्या व एक बोकड तर कुक्कुटपालनासाठी एक हजार पक्षी देण्याची योजना आहे. यंदा या योजनेतून कुक्कुटपालनाचा जिल्हाभरातील केवळ ४९ लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अकोले तालुक्यातील १०, श्रीगोंद्यातील २ व राहाता तालुक्यातील चार तर कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यांतील प्रत्येकी तीन लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.

शेळीपालनात यंदा १०८ लाभार्थी निवडले जाणार आहेत. त्यात अकोले तालुक्यातील २१, कर्जत, जामखेड तालुक्यातील प्रत्येकी पाच, कोपरगाव, नेवासा, राहाता, शेवगाव तालुक्यांतील प्रत्येकी सहा, पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येकी सात, नगर, पारनेर तालुक्यांतील प्रत्येकी आठ, संगमनेर तालुक्यातील नऊ लाभार्थी निवडले जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेल्या या योजनेला गेल्या काही वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे .

योजनेचा लाभ मिळावा म्हणून दरवर्षी अनेक शेतकरी अर्ज करतात. मात्र, त्या तुलनेत लाभ मिळत नाही. यंदाही हजारो शेतकऱ्यांनी मागणी केलेली असताना योजनेचा लाभ मात्र मोजक्या लोकांना मिळला आहे. उद्दिष्टापेक्षा मागणी जास्त असल्याने सोडत पद्धतीतून जिल्हा निवड समिती लाभार्थी निवड करत असल्याचे सांगण्यात आले.
 
लक्षांक वाढवून मिळावा
नगरसह राज्याच्या बहुतांश भागात आता शेळीपालन, कुक्कुटपालनाकडे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार केंद्रित झाले आहेत. या व्यवसायाला बॅंका मात्र सहजपणे कर्ज देत नाहीत. शिवाय पशुसंवर्धन विभागातून अनुदानाचा लाभ मिळण्याचा प्रयत्न करण्यासाठी कित्येक वेळा प्रयत्न करुनही लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनसाने लक्षांक वाढवून देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
लातूर विभागात २० लाख हेक्टरवर पिकांना...लातूर : ‘‘विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड,...
हिंगोली, परभणीकडे पावसाची पाठऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जवळपास...
उसाची बाकी द्या, अन्यथा स्वातंत्र्यदिनी...नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे...
नगरमधील एक लाखांवर शेतकरी पीक...नगर  ः ‘कोरोना’मुळे लाॅकडाउन करण्यात आले....
‘सोनगीर जामफळ’मधून विसर्गसोनगीर,  जि. धुळे  ः तापी नदीच्या...
नाशिक जिल्ह्यात दोन लाखांवर...नाशिक : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या २०२०-२१...
साताऱ्यात पीक विम्यासाठी अखेरच्या...सातारा  ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या...
पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक...पुणे  ः पंतप्रधान पीक विमा योजनेतील...
रत्नागिरीतील ७४८ शेतकरी पीकविमा योजनेत...रत्नागिरी  : खरीप हंगामाकरिता पंतप्रधान...
कोल्हापूर जिल्ह्यात पीकविमा योजनेस...कोल्हापूर  : जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा...
मुदतीपूर्वीच थांबली मका खरेदीऔरंगाबाद : मुदतवाढीला दीड दिवसाचा कालावधी शिल्लक...
किसान सभा करणार दुग्धाभिषेक घालत आंदोलननगर  ः दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी...
सांगलीतील ६७ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा...सांगली  : जिल्ह्यातील ६७ हजार शेतकऱ्यांनी...
कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील...कोल्हापूर : हमखास पाऊस असणाऱ्या जिल्ह्यातील...
प्रश्न मार्गी लागतोय असे दिसताच भाजप...नगर  : दूध दराचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य...
युरियाबाबत राज्य सरकारचा गलथान कारभार...अकोला  ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी...
महायुतीचे आज दूध बंद आंदोलन पुणे : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दूध...
व्यवस्थापन तूर पिकाचेसध्या तूर वाढीच्या टप्यात असून आंतरमशागतीची कामे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
हळदीवरील कीड, रोगांचे नियंत्रणहळदी पिकामध्ये करपा, कंदकूज रोग आणि रस शोषण...