अकोल्यात बोकड प्रदर्शनाला सुरवात

बोकड प्रदर्शनाचे उदघाटन
बोकड प्रदर्शनाचे उदघाटन

अकोला  ः येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पुढाकाराने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित बोकड प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. ९) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एम. बी. नागदेवे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर होते. या वेळी कृषी प्रक्रिया विभागाचे डॉ. प्रदीप बोरकर, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. नम्रता बाभूळकर, सहयोगी प्राध्यापिका डॉ. मयुरा गोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  मागील चार वर्षांपासून अकोला येथे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पुढाकाराने बोकड प्रदर्शन भरविले जाते. उत्पादक ते ग्राहक यांच्यातील मध्यस्थांची साखळी तोडण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले जाते. दरवर्षी यास चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. यावर्षी उद्‌घाटनाला ८ ते १० पशुपालकांनी बोकड या प्रदर्शनात आणले होते.        संस्थेच्या पूर्णाथडी म्हैस प्रक्षेत्र परिसरात प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सहयोगी प्राध्यापक डॉ. जी. जे. पंचभाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे राज्यस्तरीय प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे. पशुपालकांनी त्यांच्याकडील सुदृढ बोकड या ठिकाणी आणावे, ग्राहकांनी येथे येऊन दर्जेदार बोकडांची खरेदी करावी, असे आवाहन संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com