शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’ ः केदार

थेट शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या भेटीला आलो आहे. ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचा हा व्यवसाय एटीएम आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी काढले.
Goat, sheep breeding business is ‘ATM’: Kedar
Goat, sheep breeding business is ‘ATM’: Kedar

दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन करणारा व्यावसायिक सर्वच आपत्तींना तोंड देतो. परंतु कधीही आत्महत्या करीत नाही. म्हणून त्याचे गणित काय आहे याचे उत्तर शोधण्यासाठी थेट शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या भेटीला आलो आहे. ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचा हा व्यवसाय एटीएम आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी काढले. 

मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेळीपालन व्यवसाय पाहणीसाठी ते आले होते. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेळीपालन करणाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर धवल दूध डेअरीला सदिच्छा भेट दिली. मालपूर येथील लोकरीपासून घोंगडी तयार करणाऱ्या हातमाग व्यवसाय करणाऱ्या कुटुंबीयांची भेट घेतली. 

या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सदाशिव गोसावी, प्रकाश पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी शेळी- मेंढी विकास प्रक्षेत्रचे व्यवस्थापक डॉ. प्रियंका तोंड, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक शशांक कांबळे, उपायुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, वीरेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. 

मंत्री केदार म्हणाले, की येणाऱ्या काळात शेळीचा उपयोग दोन पद्धतीने करणार आहोत. मांस तसेच दूध जास्त देणारी दमस्क जातीचे क्रॉस बीज तयार करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. जगात ‘सानेन’ नावाची शेळी जास्त दूध देते त्या जातीच्या शेळ्या आणण्यासाठी केंद्राकडून सरकारकडून परवानगी घेतली आहे. त्यांना मार्केटमध्ये चांगला भाव आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बदलेल. बेरोजगारांचे प्रश्‍न सुटू शकतो. पशुवैद्यकीय क्षेत्रातली चार हजार पद रिक्त होती. ती पद येणाऱ्या काळात भरले जातील. पशुवैद्यकीय सेवेसाठी मोबाईल व्हॅन आली आहे. जनावरांसाठी चालता फिरता दवाखाना आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. दोन दिवसांत यंत्रणा आपल्या तालुक्यात उपलब्ध होईल. शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी आपल्या शेळी-मेंढी यांचा विमा काढून घ्यावा अर्धी रक्कम व्यावसायिकांनी भरावी, अर्धी रक्कम शासन भरणार आहे, असेही पशुपालकांना सांगितले. 

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यवसायाला भविष्यात न्याय देणार. गेल्या वर्षी दुधाची भुकटी तयार करण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून तीनशे कोटीचा उपक्रम केला. या उपक्रमासाठी ‘महानंद’कडून दूध घेतले जाईल, असे नमूद केले. तीनशे कोटी खर्च करून अर्थव्यवस्थेला मदतीचा प्रयत्न आपण केला आहे. गुजरातच्या अमूल दूध संघाकडून महाराष्ट्रातील दूध व्यावसायिकांना दुधाच्या भावात दुजाभाव केला जातो. तो होणारा अन्याय लवकरच दूर करण्यासाठी अमूल दूध संघाकडे तगादा लावणार असे मंत्री केदार यांनी सांगितले. हेमराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयवंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com