हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
बातम्या
शेळ्या-मेंढ्यांना आधुनिक औषधोपचाराची गरज ः डॉ. राय
दूध व मांस उत्पादन वाढविण्यासाठी त्यांच्यावर आधुनिकरित्या रोगनिदान व औषधोपचार ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत केंद्रीय बकरी अनुसंधान संस्थेचे निर्देशक डॉ. बी. राय (मखदूम, मथुरा, उत्तर प्रदेश) यांनी व्यक्त केले.
अकोला ः भारतातील बहुसंख्य अल्पभूधारक व भूमिहीन पशुपालक शेळीपालनास शाश्वत रोजगाराचे साधन म्हणून विशेष पसंती दर्शवितात. दूध व लोकर सारख्या उत्पादनासह मांस उत्पादनात शेळ्यामेंढ्या विविध भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. निरोगी शेळ्या-मेंढ्याची संख्या तसेच दूध व मांस उत्पादन वाढविण्यासाठी त्यांच्यावर आधुनिकरित्या रोगनिदान व औषधोपचार ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत केंद्रीय बकरी अनुसंधान संस्थेचे निर्देशक डॉ. बी. राय (मखदूम, मथुरा, उत्तर प्रदेश) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित ‘शेळ्या -मेंढ्याचे रोगनिदान, औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांतील आधुनिकता’ विषयावरील पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने होते. शेळ्या-मेंढ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वृद्धींगत करण्यासाठी त्यांचे आधुनिकरित्या रोगनिदान व औषधोपचार होणे आवश्यक असल्याचे मत प्रा. डॉ. भिकाने यांनीही अधोरेखित केले. शेळी, मेंढी या दुर्लक्षित प्राण्यांच्या रोगावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रीय रोग अन्वेषण प्रयोगशाळे (भोपाळ)चे माजी संचालक डॉ. दिवाकर कुळकर्णी यांनी संस्थेचा गौरव केला.
प्रशिक्षण समारोप प्रसंगी ‘माफसू’चे पशुविज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. ए. पी. सोमकुवर, शिक्षण विस्तार संचालक प्रा. डॉ. विलास आहेर, केंद्रीय शेळी संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. अशोक कुमार व प्रा. डॉ. चैतन्य पावशे उपस्थित होते.
- 1 of 1591
- ››