Agriculture news in Marathi Goats left in cabbage due to non-sale system | Agrowon

काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने कोबीत सोडल्या शेळ्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर, ताहाराबाद, मुल्हेर व गोळवाड परिसरात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परिपूर्ण बंद पाळण्यात आला असून त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार २१ मार्चपासून या भागात दळणवळणाची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तयार भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने व विक्रीस अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांनी थेट भरल्या मालात शेळ्या सोडल्या आहेत. 

अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर, ताहाराबाद, मुल्हेर व गोळवाड परिसरात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परिपूर्ण बंद पाळण्यात आला असून त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार २१ मार्चपासून या भागात दळणवळणाची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तयार भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने व विक्रीस अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांनी थेट भरल्या मालात शेळ्या सोडल्या आहेत. 

सटाणा तालुक्यातील बिजोटे येथील शेतकरी पोपट केदा बच्छाव यांनी ४० हजार रुपये खर्च करून कोबी लागवड केली. मात्र, विक्री व्यवस्था व त्यात भावाची अडचण असल्याने उभ्या पिकात शेळ्या सोडल्या आहेत. यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही वसूल न झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे भीतीपोटी मजूर टंचाईचा प्रश्न निर्माण झला आहे. संबंधित विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद पोपटराव अहिरे व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांच्या मालाला बाजारापर्यंत जाताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...