agriculture news in marathi God Bahiram fair Canceled due to Corona pandemic | Agrowon

बहिरम यात्रा अखेर रद्द

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांसाठी होणारी प्लॉटची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

अमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांसाठी होणारी प्लॉटची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शेती उपयोगी साहित्याची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी या यात्रेतील मुक्या जनावरांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली. त्यानंतर यात्रेतील तमाशा फड बंद करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यात्रेला शासकीय दर्जा प्राप्त करून देण्यात आला. 

यंदा कोरोनाचा प्रभाव पाहता शासनाने ही ऐतिहासिक यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बहिरम यात्रेची सुरुवात २० डिसेंबरपासून होते. त्याकरिता दुकानांसाठी जागेचा लिलाव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. या लिलाव प्रक्रियेतून चांदूरबाजार पंचायत समितीला दरवर्षी १२ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न होते त्यावरूनच या यात्रेच्या भव्यतेच्या भव्यतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. यात्रेतील दुकानांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो. कोट्यावधीची उलाढाल यात्रेदरम्यान होते. मात्र आता यात्राच रद्द झाल्याने हे सारे व्यवहार, प्रक्रिया ठप्प झाली आहे.

परंपरेप्रमाणे २० डिसेंबर रोजी होमहवन व पूजन केले जाईल. मात्र मंदिर परिसरात केवळ संस्थानचे अध्यक्ष व मर्यादित विश्‍वस्तांची उपस्थिती राहणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश न देता नियम-अटी पाळून केवळ मुखदर्शन घेता येईल.
- किशोर ठाकरे,
विश्‍वस्त, बैरम बाबा संस्थान


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...