agriculture news in marathi God Jyotiba, Kolhapur | Agrowon

‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची यात्रा

निवास मोटे ः सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि लॉकडाउनमुळे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या आज मुख्य दिवशी अख्खा डोंगर शांत होता. पालखी सोहळा भाविकांविना आणि ‘चांगभलं’चा जयघोषाशिवायच टेम्पोतून निघाला.

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि लॉकडाउनमुळे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या आज मुख्य दिवशी अख्खा डोंगर शांत होता. पालखी सोहळा भाविकांविना आणि ‘चांगभलं’चा जयघोषाशिवायच टेम्पोतून निघाला.

पहाटे पाच वाजता मुख्य मंदिरात पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. सकाळी आठ वाजता राजेशाही थाटातील आकर्षक महापूजा दहा गावकर व पुजाऱ्यांनी बांधली. सायंकाळी साडेपाचला होणाऱ्या चैत्र यात्रेतील भव्य पालखी सोहळ्याची परंपरा यंदा खंडीत झाली.

१२१ वर्षांपूर्वीही यात्रा स्थगित
चैत्र यात्रेचा सोहळा १२१ वर्षांनंतर यंदा भाविकांविना झाला. यापूर्वी१८९९ मध्ये प्लेगच्या साथीमुळे डोंगरावर चैत्र यात्रा झाली नव्हती. मंदिर गेल्या २५ दिवसांपासून बंद आहे. बाहेरील भाविकांना प्रवेश नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने चैत्र यात्रा रद्द केली. यात्रेनिमित्त निदान पंधरा लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा निघणार, अशी आशा ग्रामस्थ, पुजारी वर्गास होती; पण पालखी टेम्पोतून यमाई मंदिराकडे नेण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम राहिल्याने सोहळा रद्द झाला. पालखीची पारंपरिक परंपरा आज खंडित झाली. त्यामुळे ग्रामस्थ, पुजारी, भाविकांमध्ये नाराजी आहे.

एक भाविक दर्शनासाठी आलाच
जोतिबा डोंगरावर कालपासून सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था असतानासुद्धा आज गायमुख तलावमार्गे ६० वर्षांचा भाविक दर्शनासाठी आला. पोलिसांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी त्यास सुनाल्यावर भाविकाने ‘मी दर्शन घेतले, माझा जीव गेला तरी चालेल,’ असे म्हणत पोलिसांना हात जोडले. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...