`गोदावरी अॅग्रोफ्रेश`तर्फे आज हिंगोली येथे हळद खरेदी सुरू 

हिंगोली ः गोदावरी अॅग्रोफ्रेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे सोमवारी (ता. २०) हिंगोली येथील एमआयडीसी परिसरात हळद खरेदीची सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
Godavari Agrofresh launches turmeric in Hingoli today

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत हळदीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना हळद खरेदी, प्रक्रिया, निर्यात आदीमध्ये कळमनुरी येथील गोदा फार्म या शेतकरी उत्पादक कंपनीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. 

कळमनुरी येथील यशस्वी वाटचालीनंतर हिंगोली येथे गोदावरी अॅग्रोफ्रेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे शेतकऱ्यांची हळद खरेदी केली जाणार आहे. येत्या काळात या ठिकाणी हळद खरेदी तसेच प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे, असे सूत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com