गोदावरी एक्‍स्प्रेसने भाजीपाला मुंबईला पोचणार

Godavari Express will reach Vegetable to Mumbai
Godavari Express will reach Vegetable to Mumbai

नाशिक : लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईला भाजीपाला पाठविण्याची अनेक वर्षांपासून सुविधा सुरू होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक कारण देत ती रेल्वेने बंद केली होती. सर्वच रेल्वेगाड्यांची पार्सल सुविधा बंद केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांची अडचण सुरू होती. अखेर खासदार डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नाला यश आले असून, गुरुवार (ता. १९) पासून ही सुविधा सुरू झाली आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईला भाजीपाला पाठविण्याची बंद असलेली सुविधा पूर्ववत सुरू होत आहे. गोदावरी एक्‍स्प्रेसने मुंबईला भाजीपाला पाठविण्याची सोय पूर्ववत सुरू होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी, व्यावसायिकांची सोय झाली आहे. 

खासदार डॉ. पवार यांनी गोदावरी एक्‍स्प्रेसने भाजीपाला पाठविण्यासाठी सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांशी चर्चा करून लासलगाव येथील शिष्टमंडळ चर्चेला भुसावळ येथे पाठविले. रेल्वे प्रशासनाकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या संदर्भात पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे यांनी भुसावळ रेल्वेचे महाप्रबंधक एम. के. गुप्ता, वाणिज्य विभागप्रमुख विनोद कुमार यांच्याशी संपर्क साधून ही पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी केली. त्यांनतर अखेर ही मागणी विचाराधीन झाली असून, रेल्वेने भाजीपाला पाठविण्याचे कामकाज सुरू झाले आहे.

पाठपुराव्यानंतर यश लासलगाव, मनमाड, पिंपळगाव, निफाड आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर दररोज भाजीपाला मुंबईला पाठविण्यात येतो. हा भाजीपाला पाठविण्याची योग्य सोय व्हावी, ही बऱ्याच दिवसांपासून लोकांची मागणी होती. त्यामुळे ती कशी पूर्ण करता येईल, याबद्दल पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्याला यश आले आणि गोदावरीच्या रूपाने भाजीपाला पाठविण्याची सोय पुन्हा पूर्ववत झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com