गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘मिल्क बाउल’ : आयुक्त उमाप

गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘मिल्क बाउल’
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘मिल्क बाउल’

नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची राज्यभर ओळख झाली. तालुक्‍यातील दूध उत्पादकांना हा संघ ‘मिल्क बाउल’ ठरला. या संघाने पशुपालकांना प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली, हे प्रगतीचे लक्षण आहे,’’ असे प्रतिपादन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी केले. दुष्काळी स्थिती लक्षात घेता, विभागाने २४ हजार क्‍विंटल बियाणे चारा उत्पादनासाठी उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. 

गोदावरी दूध संघाच्या ४४व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन विस्तारित   पशुरोगनिदान प्रयोगशाळा, तसेच भारतीय गो-वंशाच्या सॉर्टेड सिमेनचा प्रारंभ करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, ‘बायफ’चे विभागीय निदेशक डॉ. आलोक जुनेजा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, समन्वयक व्ही. बी. दयासा, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी प्रास्ताविक केले. 

उमाप म्हणाले, ‘‘दूध उत्पादनात राज्याचा सातवा क्रमांक असून, उत्पादकांना सामाजिक स्वास्थ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. आगामी काळात नगर जिल्हा दूध उत्पादनात राज्याचे नेतृत्व करील.’’ 

सॉर्टेड सिमेनमधील उत्कृष्ट कामाबद्दल बाळासाहेब कोल्हे (सोनेवाडी), रामदास खामकर (टाकळी), बी. एम. जाधव (कुंभारी), माधव शिंदे (कनोली) यांचा सन्मान करण्यात आला. संचालक उत्तम माने यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com