‘गोकूळ’च्या अध्यक्षांचा राजीनामा

‘गोकूळ’च्या अध्यक्षांचा राजीनामा
‘गोकूळ’च्या अध्यक्षांचा राजीनामा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ)चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी आपला राजीनामा नववर्षाच्या पहिल्या दिवशी कार्यकारी संचालकांकडे सुपूर्द केला आहे. नव्या अध्यक्षपदासाठी मात्र मोठी चुरस निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अध्यक्ष बदलावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी कोणत्या टप्प्यावर थांबणार, याची संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.  या वेळी पहिल्यांदाच अध्यक्ष बदलावरून संघातील मनमानी कारभार, मुंबईतील जागा खरेदी, दूध पावडरची परस्पर विक्री यावरून संचालकांत दोन गट पडले. हे दोन्ही गट संघाचे नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यात विभागले. यातूनच काटावरच्या सदस्यांशी संपर्क साधून त्यांना आपल्याकडे खेचण्याचाही प्रयत्न झाला. संघात आता नऊ विरुद्ध आठ अशी चर्चा सुरू झाली आहे.  अर्थात या सगळ्या समीकरणात महत्त्वाची भूमिका रिमोट कंट्रोल म्हणून समजले जाणारे महादेव महाडिक हेच घेणार असल्याने या सगळ्या घोळांमध्ये कोण बाजी मारणार हे थोड्याच दिवसांत समजणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com