संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपये वाढ
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. ही दरवाढ २१ मेपासून जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना लागू होणार आहे. या दरवाढीमुळे गाय दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २५ रुपये असा दर मिळेल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली.

राज्यात गायीचे दूध अतिरिक्त झाल्यामुळे राज्यातील सर्वच दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. जानेवारी महिन्यात गाय दूध दरात दोन रुपयांनी कपात करून २५ रुपये लिटर दुधाचा दर २३ रुपयांवर आला होता. यामुळे दूध उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. गायीला जादा पशुखाद्य द्यावे लागते.
तसेच औषध-पाण्याचा खर्च जादा येतो. त्यामुळे गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपयांपेक्षा जास्त दर मिळावा, अशी मागणी गाय दूध उत्पादकांकडून होत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘अमूल’ने गाय दूध विक्री दरात वाढ केली आहे. ‘गोकुळ’नेही सावध पवित्रा घेत, गाय दूध विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आता खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे विक्री दरातही दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- 1 of 657
- ››