agriculture news in Marathi, Gokul increased 2 rupees in cow milk purchase rate, Maharashtra | Agrowon

गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपये वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. ही दरवाढ २१ मेपासून जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना लागू होणार आहे. या दरवाढीमुळे गाय दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २५ रुपये असा दर मिळेल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. ही दरवाढ २१ मेपासून जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना लागू होणार आहे. या दरवाढीमुळे गाय दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २५ रुपये असा दर मिळेल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली.

राज्यात गायीचे दूध अतिरिक्‍त झाल्यामुळे राज्यातील सर्वच दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. जानेवारी महिन्यात गाय दूध दरात दोन रुपयांनी कपात करून २५ रुपये लिटर दुधाचा दर २३ रुपयांवर आला होता. यामुळे दूध उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात होती. गायीला जादा पशुखाद्य द्यावे लागते. 

तसेच औषध-पाण्याचा खर्च जादा येतो. त्यामुळे गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपयांपेक्षा जास्त दर मिळावा, अशी मागणी गाय दूध उत्पादकांकडून होत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘अमूल’ने गाय दूध विक्री दरात वाढ केली आहे. ‘गोकुळ’नेही सावध पवित्रा घेत, गाय दूध विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आता खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे विक्री दरातही दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...