‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर 

कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता.२२) पासून घटलेले संकलन गुरुवार(ता २६) पासून पूर्वपदावर आले आहे.
milk_collection
milk_collection

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता.२२) पासून घटलेले संकलन गुरुवार(ता २६) पासून पूर्वपदावर आले आहे. हॉटेल व अन्य दुकाने बंद असल्याने मुंबई, पुण्यात अजूनही दूध विक्री करण्यात अडचणी येत असल्याने विक्री दोन लाख लिटरने घटली आहे.  गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी (ता.२६) नियमित संकलन झाल्याची माहिती ‘गोकुळ’च्या सूत्रांनी दिली. जनता कर्फ्यूपासून दोन दिवस संकलन दोन लाख लीटरपेक्षा अधिक घटले होते. अनेक गावांनी सीमा बंद केल्याने दुधाचे संकलन होऊ शकले नव्हते. यामुळे ‘गोकुळ’कडे येणाऱ्या दुधात घट झाली होती. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालत सर्व गावांतील नागरिकांना दुधाचे टँकर अडविण्यात येऊ नयेत, संकलन व्यवस्थित करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. ग्रामस्थांनी दुधाचे संकलन करून गाड्या संघाकडे पाठवण्यासाठी सहमती दिली. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून दुधाचे नियमित ११ लाख लीटर संकलन होत असल्याची माहिती संकलन अधिकारी श्री. तुरुंबेकर यांनी दिली.  दूध संकलन संस्थांनी करताना सोशल डिस्टन्स ठेवावे, शेतकऱ्यांनी मास्क घातल्या शिवाय दूध संस्थेत येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे श्री. तुरुंबेकर यांनी सांगितले.  मोठे हॉटेल, हॉस्टेल व दुकाने बंद असल्याचा फटका विक्रीला बसला आहे. मुंबईत सुमारे ३० ते ३५ हजार तर पुण्यात दीड ते पावणेदोन लाख लीटर दूध विक्री ठप्प झाली आहे. दररोज सरासरी दोन लाख लीटर दुधाची विक्री होत नसल्याचे विक्री अधिकार धैर्यशील घोरपडे यांनी सांगितले. टँकर जाण्यात मात्र कोणत्याच अडचणी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com