agriculture news in Marathi GOKUL milk procurement on track Maharashtra | Agrowon

‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता.२२) पासून घटलेले संकलन गुरुवार(ता २६) पासून पूर्वपदावर आले आहे.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता.२२) पासून घटलेले संकलन गुरुवार(ता २६) पासून पूर्वपदावर आले आहे. हॉटेल व अन्य दुकाने बंद असल्याने मुंबई, पुण्यात अजूनही दूध विक्री करण्यात अडचणी येत असल्याने विक्री दोन लाख लिटरने घटली आहे. 

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी (ता.२६) नियमित संकलन झाल्याची माहिती ‘गोकुळ’च्या सूत्रांनी दिली. जनता कर्फ्यूपासून दोन दिवस संकलन दोन लाख लीटरपेक्षा अधिक घटले होते. अनेक गावांनी सीमा बंद केल्याने दुधाचे संकलन होऊ शकले नव्हते. यामुळे ‘गोकुळ’कडे येणाऱ्या दुधात घट झाली होती. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालत सर्व गावांतील नागरिकांना दुधाचे टँकर अडविण्यात येऊ नयेत, संकलन व्यवस्थित करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.

त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. ग्रामस्थांनी दुधाचे संकलन करून गाड्या संघाकडे पाठवण्यासाठी सहमती दिली. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून दुधाचे नियमित ११ लाख लीटर संकलन होत असल्याची माहिती संकलन अधिकारी श्री. तुरुंबेकर यांनी दिली. 

दूध संकलन संस्थांनी करताना सोशल डिस्टन्स ठेवावे, शेतकऱ्यांनी मास्क घातल्या शिवाय दूध संस्थेत येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे श्री. तुरुंबेकर यांनी सांगितले. 

मोठे हॉटेल, हॉस्टेल व दुकाने बंद असल्याचा फटका विक्रीला बसला आहे. मुंबईत सुमारे ३० ते ३५ हजार तर पुण्यात दीड ते पावणेदोन लाख लीटर दूध विक्री ठप्प झाली आहे. दररोज सरासरी दोन लाख लीटर दुधाची विक्री होत नसल्याचे विक्री अधिकार धैर्यशील घोरपडे यांनी सांगितले. टँकर जाण्यात मात्र कोणत्याच अडचणी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


इतर बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
वाशीममधील कृषी निविष्ठा केंद्रे सुरू...वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...