‘गोकुळ’मध्ये होणार अतिरिक्त दुधावर प्रक्रिया 

लॉकडाऊनचा फटका दुग्ध व्यवसायाला बसला असून दुधाची मागणी घटल्याने शासनाने गायीचे अतिरिक्त दूध २५ रुपये प्रती लिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
milk_collection
milk_collection

कोल्हापूर ः लॉकडाऊनचा फटका दुग्ध व्यवसायाला बसला असून दुधाची मागणी घटल्याने शासनाने गायीचे अतिरिक्त दूध २५ रुपये प्रती लिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण या दुधावर प्रक्रिया करून त्यापासून पावडर व लोणी तयार करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा दूध संघावर (गोकुळ) सोपवली आहे. राज्यातील चार दूध संघातील किमान दोन लाख दुधावर ‘गोकुळ'ला प्रक्रिया करावी लागणार आहे. यापोटी ‘गोकुळ’ला ‘कनर्व्हजन’ चार्जेस मिळणार आहेत. ‘गोकुळ’मध्ये तयार होणारी पावडर व लोणी महानंदच्या ब्रॅंडखाली बाजारात येणार आहेत.  ‘गोकुळ’चे दूध संकलन कायम आहे, तथापि विक्रीत दररोज सुमारे तीन लाख लिटरची घट झाली आहे. अशीच स्थिती इतर संघांची आहे. पुणे विभागात दररोज सुमारे सात लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी राज्य शासनानेच राज्यातील अतिरिक्त गायीचे दूध २५ रुपये प्रती लिटरने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर संघाना प्रशासकीय खर्चापोटी शासन प्रती लिटर अडीच रुपये देणार आहे. पुणे विभागात खरेदी करण्यात येणाऱ्या या दुधावर प्रक्रिया करण्याचा मोठा प्रश्‍न शासनासमोर होता. त्यावर ‘गोकुळ’ने आधार दिला आहे.  ‘गोकुळ’कडे दररोज पाच लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सध्या ‘गोकुळ’चेच तीन लाख लिटर दूध शिल्लक राहते. उर्वरित दोन लाख लिटर हे पुणे विभागातील चार दूध संघाकडून ‘गोकुळ’ला पाठवण्यात येणार आहे. त्यावर प्रक्रिया करून ते राज्य सहकारी दूध संघाच्या ‘महानंद’च्या ब्रॅंडखाली विक्रीला उपलब्ध करण्यात येणार आहे.  ‘गोकुळ’कडे शिवामृत्त व पुणे जिल्हा दूध संघाकडून प्रत्येकी ४० हजार लिटर तर बारामती संघाकडून एक लाख लिटर दूध येणार आहे. याशिवाय कोयना व फत्तेसिंह नाईक संघाकडून प्रत्येकी दहा हजार लिटर असे एकूण २ लाख लिटर दूध येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com