Gokul's milk is now also available in Tetrapack
Gokul's milk is now also available in Tetrapack

‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही उपलब्ध

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकूळ) ‘गोकूळ सिलेक्ट’ हे टेट्रापॅक दूध बाजारात दाखल केले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकूळ) ‘गोकूळ सिलेक्ट’ हे  टेट्रापॅक दूध बाजारात दाखल केले आहे.

अत्यंत उच्च तापमानात प्रक्रिया केलेले टेट्रापॅक दूध मुंबईत दाखल झाले आहे. ते सहा महिने टिकते. त्यामुळे ग्राहकाला एकदा खरेदी करून अनेक आठवडे किंवा महिने ते वापरता येत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली.

हे दूध सर्वसामान्य तापमानामध्ये ठेवता येते आणि सहा महिन्यांमध्ये कधीही वापरता येते. पाकिटातील दुधाची चव किंवा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही. हे टेट्रापॅक एक लिटरच्या पाकिटामध्ये उपलब्ध असून ते ६४ रुपये प्रतिलिटर या दराने उपलब्ध आहे.

“गोकुळला सध्याच्या टेट्रापॅक दुधाच्या बाजारपेठेतील २० टक्क्यांचा किमान वाटा पुढील दोन वर्षांमध्ये मिळवायचा आहे. मुंबईतील टेट्रापॅक दुधाच्या बाजारपेठेची क्षमता प्रतिदिन पाच लाख लिटर एवढा आहे. मुंबई नंतर ‘गोकूळ सिलेक्ट’ दूध हे नंतरच्या टप्प्यांमध्ये पुणे तसेच दिल्लीसारख्या इतर राज्यांमध्येही प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर जेथे सुरळीत पुरवठा करणे कठीण असते अशा हिमाचल प्रदेश आणि उत्तर-पूर्व भागातील राज्ये, गोवा, उर्वरित महाराष्ट्र अशा भागांमध्येही हे उत्पादन दाखल होणार आहे.” असे श्री. आपटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com