‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडे

सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला हादरा देत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आदी नेत्यांच्या पॅनेलने ‘गोकुळ’ची सत्ता मिळविण्याकडे वाटचाल सुरू ठेवली होती.
Gokul's tendency towards independence
Gokul's tendency towards independence

कोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला हादरा देत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आदी नेत्यांच्या पॅनेलने ‘गोकुळ’ची सत्ता मिळविण्याकडे वाटचाल सुरू ठेवली होती. क्रॉस व्होटिंगमुळे विरोधी आघाडीचे १२ उमेदवार माफक आघाडी मिळवून होते. मंगळवारी (ता. ४) सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी सातपर्यंत सुरूच होती.

पहिल्या फेरीपासूनच निर्माण झालेली चुरस प्रत्येक फेरीत अत्यंत कमी मताधिक्य असल्याने सर्वच उमेदवार दिवसभर तणावात दिसले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी पॅनेलवर संघर्ष पूर्ण लढतीत वर्चस्व मिळवण्याची धडपड सुरू ठेवली होती. तिसऱ्या फेरी अखेर १६ पैकी विरोधी आघाडीच्या १२ उमेदवारांनी संघर्ष पूर्ण लढतीत विजयाकडे कूच सुरू ठेवली होती. निवडणुकीत मतदारांनी ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान न करता उमेदवार पाहून मतदान केल्याने निवडणुकीचे अंदाज चुकत असल्याचे चित्र निकाला दरम्यान दिसले.

गेली दोन महिने निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले होते. महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत युद्ध पुकारले होते. अखेर सत्ताधारी गटाला हादरा देत विरोधी सतेज पाटील गटाने विजय मिळवला.

राखीव जागांमध्ये विरोधी आघाडीचे वर्चस्व दुपारी दीड वाजता इतर मागास व महिला गटाचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पाच पैकी चार जागा जिंकत विरोधी आघाडीने घोडदौडीस सुरुवात केली. सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके यांच्यासह अंजना रेडकर यांनी विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीच्या शौमिका महाडिक यांनी विजय मिळवत सत्ताधारी गटाच्या आशा कायम ठेवल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com