Agriculture news in Marathi Gokul's tendency towards independence | Agrowon

‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला हादरा देत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आदी नेत्यांच्या पॅनेलने ‘गोकुळ’ची सत्ता मिळविण्याकडे वाटचाल सुरू ठेवली होती.

कोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला हादरा देत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आदी नेत्यांच्या पॅनेलने ‘गोकुळ’ची सत्ता मिळविण्याकडे वाटचाल सुरू ठेवली होती. क्रॉस व्होटिंगमुळे विरोधी आघाडीचे १२ उमेदवार माफक आघाडी मिळवून होते. मंगळवारी (ता. ४) सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी सातपर्यंत सुरूच होती.

पहिल्या फेरीपासूनच निर्माण झालेली चुरस प्रत्येक फेरीत अत्यंत कमी मताधिक्य असल्याने सर्वच उमेदवार दिवसभर तणावात दिसले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी पॅनेलवर संघर्ष पूर्ण लढतीत वर्चस्व मिळवण्याची धडपड सुरू ठेवली होती. तिसऱ्या फेरी अखेर १६ पैकी विरोधी आघाडीच्या १२ उमेदवारांनी संघर्ष पूर्ण लढतीत विजयाकडे कूच सुरू ठेवली होती. निवडणुकीत मतदारांनी ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान न करता उमेदवार पाहून मतदान केल्याने निवडणुकीचे अंदाज चुकत असल्याचे चित्र निकाला दरम्यान दिसले.

गेली दोन महिने निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले होते. महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत युद्ध पुकारले होते. अखेर सत्ताधारी गटाला हादरा देत विरोधी सतेज पाटील गटाने विजय मिळवला.

राखीव जागांमध्ये विरोधी आघाडीचे वर्चस्व
दुपारी दीड वाजता इतर मागास व महिला गटाचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पाच पैकी चार जागा जिंकत विरोधी आघाडीने घोडदौडीस सुरुवात केली. सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके यांच्यासह अंजना रेडकर यांनी विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीच्या शौमिका महाडिक यांनी विजय मिळवत सत्ताधारी गटाच्या आशा कायम ठेवल्या.


इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...