परभणीतील बीज परीक्षण प्रयोगशाळेस सुवर्ण पुरस्कार

परभणी ः येथील कृषी विभागाची बीज परीक्षण प्रयोगशाळा.
परभणी ः येथील कृषी विभागाची बीज परीक्षण प्रयोगशाळा.
परभणी ः परभणी येथील कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेस नवी दिल्ली येथील भारतीय गुणवत्ता परिषदेने २०१७ या वर्षीचा डी. एल. शहा गुणवत्ता सुवर्ण पुरस्कार (गोल्ड अॅवार्ड) जाहीर केला आहे.
 
शुक्रवारी (ता. २२) नवी दिल्ली येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती बीज परीक्षण अधिकारी पी. जी. कुलकर्णी यांनी दिली. परभणी येथील कृषी विभागाच्या या बीज परीक्षण प्रयोगशाळेस २०१५ मध्ये राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (एनएबीएल) या संसथेकडून आयएसओ १७०२५ मानांकन प्राप्त झाले आहे.
 
आयएसओ मानांकन प्राप्त करणारी देशातील पहिली बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे देण्यात येणारा डी. एल. शहा गुणवत्ता पुरस्कार उद्योग, तसेच सेवा क्षेत्रात प्रतिष्ठेचा तसेच गुणवत्तेचे प्रतीक मानला जातो.
 
परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस जाहीर झालेला डी. एल. शहा गुणवत्ता सुवर्ण पुरस्कार नवी दिल्ली येथे शुक्रवारी (ता. २२) आयोजित कार्यक्रमामध्ये दिला जाणार आहे.या कामगिरीबद्दल कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी प्रयोगशाळेच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
 
१९८४ मध्ये परभणी येथे स्थापन करण्यात आलेल्या या बीज परीक्षण प्रयोगशाळेत मराठवाड्यातील बियाणे कायद्यांतर्गत प्राप्त होणारे बीज नमुने, तसेच बीज प्रमाणीकरण यंत्रणा, महाबीज, कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्राप्त होणारे बीज नमुने, खासगी कंपन्या, संस्था, शेतकरी यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या बीज नमुन्यांची उगवण शक्ती, भौतिक शुद्धता आदींचे परीक्षण केले जाते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com