बियाणे, खते विक्रीचे अधिकार द्या, गोंदिया बाजार समिती संचालकांची मागणी

कापूस बियाणे
कापूस बियाणे

गोंदिया ः शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीला प्राधान्य देतात. त्यामुळे बाजार समित्यांना हंगामात बियाणे व खत विक्रीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी बाजार समिती संचालक सुरेश अग्रवाल यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना या संदर्भाने निवेदन पाठविण्यात आले.  निवेदनानुसार, गोंदिया बाजार समिती अंतर्गंत १५६ गावांचा समावेश होतो. या गावातील शेतकरी हंगामात धान विक्रीसाठी बाजार समितीत येतात. बाजार समितीत धान विक्री केल्यानंतर काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. शेतकऱ्यांचे शोषण रोखण्याचा प्रयत्न बाजार समिती करते. खरीप हंगामात शेतकरी बाजारपेठेतून बियाणे, खते व इतर निविष्ठांची खरेदी करतात. यामध्ये व्यापाऱ्यांकडून अनेकदा शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. यातूनच शेतकऱ्यांची लूटही होते. ही लूट थांबविण्यासाठी बाजार समित्यांना निविष्ठा विक्रीचे अधिकार देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना या माध्यमातून माफक दरात बियाणे व खत मिळेल. त्यामुळे शासनाने यावर विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com