गोंदियात पीकविम्यातून ३८ हजार ६६९ हेक्‍टर क्षेत्र संरक्षित

गोंदियात पीकविम्यातून ३८ हजार ६६९ हेक्‍टर क्षेत्र संरक्षित
गोंदियात पीकविम्यातून ३८ हजार ६६९ हेक्‍टर क्षेत्र संरक्षित

गोंदिया  ः पावसाने खंड दिल्याच्या परिणामी नुकसान होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील तब्बल ६९ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याला पसंती दिली आहे. यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या अधिक असून बिगर कर्जदार मात्र अत्यल्प आहेत. पूर्व विदर्भातील गोंदिया येथे यावर्षीच्या खरिपात सुमारे एक लाख ९२ हजार हेक्‍टरवर धान लागवडीचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु, जून आणि जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यात धान रोवणीची कामे प्रभावित झाली. मोठ्या क्षेत्रावर पावसाअभावी रोवणी होऊ शकली नाही. काही भागात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यातच हवामान विभागाचे अंदाजदेखील चुकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्याची चिंता वाढीस लागली होती. त्याच विवंचनेतून शेतकऱ्यांनी पीकविम्याला पसंती दिली. जिल्ह्यातील एकूण ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. यामध्ये कर्जदार ६३ हजार ४१२ शेतकरी आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या अवघी ५ हजार ८९० इतकी अत्यल्प आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीकविमा सक्‍तीचा असल्याने देखील त्यांचा प्रतिसाद योजनेला जास्त मिळाल्याचे जाणकार सांगतात. ३८ हजार ६६९ हेक्‍टर क्षेत्र या माध्यमातून शेतकऱ्यांनी संरक्षित केले आहे. विमा हप्त्यापोटी १४ कोटी १७ लाख ६२ हजार २५७ रुपयांचा भरणा कंपन्यांकडे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद विमा योजनेला असताना भरपाईच्यावेळी मात्र अनेक अटी आणि नियमांककडे कंपन्यांकडून बोट दाखविले जाते. गेल्या काही वर्षांतील हा अनुभव पाहता शेतकऱ्यांमध्ये विम्यासंदर्भाने उदासिनता निर्माण होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com