नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
बातम्या
गोंदियात किमान तापमान १० अंशांवर
शनिवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ आणि विदर्भातील गोंदिया येथे नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर प्रदेश या भागांत थंडीची लाट असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात घट झाली आहे. शनिवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ आणि विदर्भातील गोंदिया येथे नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात कोरडे हवामान आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुढील पाच ते सहा दिवस ही थंडी कायम राहणार आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्यांत पाऊस, तर काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे राज्यातील थंडीतही चढउतार होत आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडी असल्याने किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मराठवाडा व विदर्भात थंडी अधिक प्रमाणात असल्याने किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली उतरला आहे. कोकणातही बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यत खाली आले आहे. राज्यात दिवसभर ऊन असले, तरी दुपारी ११ वाजल्यानंतर उन्हाचा चटका वाढला असल्याची स्थिती आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे.
शहरातील किमान तापमान (कंसात वाढ, घट झालेले तापमान)
- मुंबई (सांताक्रूझ) १८.८ (२)
- ठाणे १८
- अलिबाग १६.६ (-१)
- रत्नागिरी १९.९ (१)
- डहाणू १९ (२)
- पुणे १३.९ (३)
- जळगाव ११.६ (-१)
- कोल्हापूर १९ (४)
- महाबळेश्वर १५.३ (२)
- मालेगाव १५.२ (५)
- नाशिक १४ (४)
- निफाड १०.६
- सांगली १७.३ (३)
- सातारा १५.४ (३)
- सोलापूर १८.१ (२)
- औरंगाबाद १५.४ (३)
- बीड १७.३ (३)
- परभणी १५.७ (१)
- परभणी कृषी विद्यापीठ १०
- नांदेड १७.५ (३)
- उस्मानाबाद १७.३ (२)
- अकोला १४.३ (१)
- अमरावती १४.७
- बुलडाणा ११.७ (-३)
- चंद्रपूर १४ (-१)
- गोंदिया १० (-३)
- 1 of 1548
- ››