गोंदिया जिल्हा बॅंकेची कर्जपरतफेडीस मुदतवाढ 

गोंदिया ः ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेत गोंदिया जिल्हा बॅंकेने कर्ज परतफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील ३१ हजारांवर शेतकऱ्यांना फायदा होत त्यांना दिलासा मिळणार आहे.
Gondia District Bank Extends Debt Repayments
Gondia District Bank Extends Debt Repayments

गोंदिया ः ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेत गोंदिया जिल्हा बॅंकेने कर्ज परतफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील ३१ हजारांवर शेतकऱ्यांना फायदा होत त्यांना दिलासा मिळणार आहे. 

शासनाने पीककर्ज परतफेडीची मुदत ३१ मार्चवरुन ३१ जून पर्यंत केली आहे. परंतू ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एका महिन्यात शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदलणार नाही. ही बाब लक्षात घेत गोंदिया जिल्हा बॅंकेकडून पीककर्ज परतफेडीस तीन महिन्यांची वाढ देण्यात आली आहे. 

गोंदिया जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने मोबाईल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या विषयावर चर्चा केली. त्याआधारे तीन जूनपर्यंत पीककर्ज परतफेडीस वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल व पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सुद्धा चर्चा केली. 

कर्जाची परतफेड केल्यानंतर शेतकऱ्यांना रिझर्व्ह बॅंक व नाबार्डच्या निर्देशानुसार नवीन पीककर्ज देण्यात येईल. तसेच रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार इतर मध्यम मुदतीच कर्जदारांना सुद्धा तीन हप्त्यांची सवलत देण्यात येणार आहे. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

खरिपात १११ कोटींचे कर्जवाटप  जिल्हा बॅंकेकडून गेल्या खरीप हंगामात ३१ हजार ६२० शेतकऱ्यांना एकूण १११ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बॅंकेच्या तुलनेत हे सर्वाधिक होते. 

शेतकरी हित नजरेसमोर ठेवून सर्वांच्या सहमतीने पीककर्ज परतफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ३० जून पर्यंत आता कर्जाची परतफेड करता येईल.  - राजेंद्र जैन,  अध्यक्ष, जिल्हा बॅंक, गोंदिया  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com