Agriculture news in Marathi Gondia leads in crop loan disbursement | Agrowon

गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत राज्यात तिसरे स्थान राखले आहे. आत्तापर्यंत एकूण २२९० शेतकऱ्यांना दोनशे तीस कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

गोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत राज्यात तिसरे स्थान राखले आहे. आत्तापर्यंत एकूण २२९० शेतकऱ्यांना दोनशे तीस कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यातही जिल्हा बँकेने सर्वाधिक १३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती सहकार खात्याच्या सूत्रांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ८५.५१ टक्के या प्रमाणे साध्य झाले आहे.

खरीप हंगामासाठी आंतरमशागत तसेच निविष्ठांच्या खरेदी करता लागणाऱ्या पैशांची सोय म्हणून पीक कर्जाची उपलब्धता केली जाते. नाबार्ड आणि शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीयीकृत,  ग्रामीण तसेच जिल्हा बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट त्याकरिता निश्चित होते. यावर्षी या तीनही बँकांना खरीप हंगामात एकूण  २३६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी जिल्हा बँकेने १३७ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती केली आहे. ग्रामीण बँकेने सुद्धा ८५ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँका मात्र या वर्षीही पीक कर्जवाटप झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिन्ही बँकांनी आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४९ हजार २९० शेतकऱ्यांना २३० कोटी ८६ लाख ५३ हजार रुपयांचे पीक कर्ज
वाटप केले.

त्यामुळेच यंदा जिल्हा पीक कर्ज वाटपात राज्यात तिसरा क्रमांक आहे. खरीप आणि रब्बी हंगामासाठी यावर्षी २७० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरिपातच कोरोनाचा प्रादुर्भाव असतानासुद्धा २३१ कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया ३१ सप्टेंबर पर्यंत चालणार असून त्यामुळे पीक कर्ज वाटपाचा टक्काही वाढणार आहे.


इतर बातम्या
राज्यात यंदा सोळा टक्के अधिक पाऊसयंदा हवामान विभागाने चांगल्या पाऊस मानाचे संकेत...
पुणे जिल्ह्याला ‘निसर्ग’च्या...पुणे : जून महिन्यात आलेल्या चक्रिवादळाने...
पाथरूडमध्ये सोयाबीन मळणीच्या कामांना वेगपाथरुड, जि. उस्मानाबाद  : मागील आठ - दहा...
नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादकांना चार...नांदेड : जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक...
परभणी जिल्ह्यात गहू, हरभऱ्याचे क्षेत्र...परभणी :  सिंचन स्त्रोतांना मुबलक प्रमाणात...
सांगलीत ऑनलाइन सातबाऱ्यावर नाहीत...सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीने ८००...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८०० हुन अधिक...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात काढलेले...परभणी : दोन, तीन दिवासांच्या उघडीपीनंतर बुधवारी (...
नाशिक विभागात अतिवृष्टीमुळे ८३ हजार...नाशिक : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून...
पालखीमार्गाच्या भूसंपादनाबाबत...माळीनगर, जि. सोलापूर  : पालखीमार्गाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्या कारवाईला आव्हान...पुणे : सोयाबीन बियाणे प्रकरणी थेट परवाने रद्द...
शिक्षण, संशोधन हितासाठीच बदल्यांना...पुणे : शासनाचे आर्थिक हित व कृषी शिक्षण,संशोधनाचे...
परतीचा मॉन्सून उद्या राजस्थान,...पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी...
सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांसाठी ३१...मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाचे आज ई...वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...
मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा...पुणे : राज्यातील काही भागात पावसासाठी...
जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत...अकोला : गुजरातमधील बोताड आणि कच्छ या...
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून...मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद...
जालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबरपर्यंत...मुंबई : जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे...
बाजार समिती आवाराबाहेर सेस वसुलीबाबत...पुणे : बाजार समितीच्या आवाराबाहेर शेती...