agriculture news in marathi, 'Good day' for dry fish market | Agrowon

सुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन'
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 मे 2019

महागाईचा फटका सुक्‍या मासळीलाही बसला आहे. बोंबील शेकड्यामागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढले आहेत. बांगडा, मांदेली, कोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढले आहेत  पावसाळ्यात सुकी मासळी ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुख्य गरज असते. त्यामुळे खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. 
- दिनेश कासेकर, चिपळूण

चिपळूण :  पावसाळ्यात हवीहवीशी वाटणारी सुकी मासळी खरेदीसाठी चिपळूणच्या सुक्‍या मासळी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन' आले आहेत. 

पावसाळा सुरू झाला की चिपळूण तालुक्‍यातील शेतकरी शेतीपूर्व कामाला लागतात. पावसाळ्यात शेती हंगाम चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारात खरेदीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तीन ते चार महिने पुरेल इतका मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून त्याचा साठा करून ठेवतात. त्याचबरोबर विविध प्रकारची सुकी मच्छीही भरून ठेवतात. पावसाळा आधी केल्या जाणाऱ्या या चार महिन्यांच्या खरेदीला आगोट असे म्हणतात. यंदा पाऊस लवकर येणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पूर्व मशागतीचे कामे सुरू केली आहेत. 

शेतकऱ्यांनी अगोटाच्या खरेदीला सुरवात केली आहे. अनेक गावांत आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडताना दिसत आहे. महागाई असतानाही खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंबरोबरच सुक्‍या मासळीची खरेदीही जोरदारपणे सुरू आहे.

सुक्‍या मासळीला ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात. 
गुहागरसह दापोली भागातील महिला सुके मावरे घेऊन चिपळूणला येतात. येथील आठवडा बाजारात आपली दुकाने थाटून सुकी मासळी विकतात. इतर दिवशी डोक्‍यावर टोपले घेऊन गावो गावी फिरून मासळी विक्री करतात.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...