अकोला जिल्ह्यावर शासनाची निधीद्वारे कृपादृष्टी

अकोला जिल्ह्यावर शासनाची निधीद्वारे कृपादृष्टी
अकोला जिल्ह्यावर शासनाची निधीद्वारे कृपादृष्टी

अकोला :  जिल्ह्यात टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना शासनाने दिलासा दिला असून, जिल्ह्यात ३६१ गावांसाठी १०६ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या अाहेत. विविध योजनांसाठी जिल्ह्याला सुमारे ४३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे.   

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील २ वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ताबाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकारचे निर्देश होते. त्यामुळे मागील दोन वर्षामध्ये खूप कमी योजना राज्यामध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. ही स्थगिती उठविण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला.

त्यामुळे केंद्र शासनाने सन २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली. यावर्षी जिल्ह्यातील ३६१  वाड्या/वस्त्यांसाठी १०६ योजनांचा समावेशक असा आराखडा तयार करण्यात आला. या योजना राबविण्यासाठी एकूण ३८९ कोटी ३२ लाख रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी हा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.  

या अगोदर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून २५ गावांसाठी १९ योजना मंजूर केल्या असून त्यासाठी ३६ कोटी ७९ लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात शौचालयाच्या बांधकामासाठी सात कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com